तळवली आगरवाडी अंगणवाडीचे सुरेशदादा सावंत यांच्या हस्ते उदघाटन उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟪🟪

तळवली आगरवाडी अंगणवाडीचे सुरेशदादा सावंत यांच्या हस्ते उदघाटन उत्साहात संपन्न

वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांची शुभेच्छांची अनोखी भेट

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील तळवली आगरवाडी येथील अंगणवाडीचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा विकास समन्वय समिती सदस्य सुरेश (दादा) सावंत यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात पार पडले.

विशेष म्हणजे, याच दिवशी सुरेशदादांचा वाढदिवस असल्याने कार्यक्रमाला दुहेरी रंग चढला. केक कापल्यानंतर ग्रामस्थांनी गाणी गाऊन शुभेच्छा दिल्या. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अंगणवाडीचे उदघाटन वाढदिवसाच्या दिवशी आयोजित करून सुरेशदादांना शुभेच्छांची अनोखी भेट देण्यात आली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, उपाध्यक्ष दीपक शिलधनकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष सोलकर, तळवलीचे उपसरपंच संतोष जोशी, सदस्य सुनिल मते, अंगणवाडी सेविका सुनिता सांगळे, प्रेरणा पवार, मदतनीस अश्विनी पवार, मितांजली पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंगणवाडीच्या उभारणीसाठी सुरेशदादा सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे खासदार सुनिल तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला होता. कित्येक वर्षे रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.

या वेळी तालुकाध्यक्ष साहिल आरेकर म्हणाले की, “सुरेशदादा जिल्हा परिषदेत गेले तर आपल्या भागाला हक्काचा माणूस मिळेल आणि विकासकामे साध्य होतील.”

मनोगतात सुरेशदादा सावंत म्हणाले, “अंगणवाडी होऊ नये म्हणून अडथळे आणले गेले; मात्र खासदार तटकरे व आमदार तटकरे यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाले. मी फक्त पाठपुरावा केला. पुढेही ग्रामस्थांसाठी विकासकामे साध्य करण्याचा प्रयत्न करीन. संधी मिळाली तर जिल्हा परिषदेतही जाईन.” असे सांगून त्यांनी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छांबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.

✅ हॅशटॅग

#गुहागर #रत्नागिरी #तळवली #अंगणवाडी #सुरेशदादासावंत #राष्ट्रवादीकाँग्रेस #विकासकामे

📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा