सेवा पंधरवड्यात दापोली तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे- —तहसीलदार अर्चना बोंबे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 सेवा पंधरवड्यात दापोली तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे- —तहसीलदार अर्चना बोंबे

रत्नागिरी :— छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये दापोली तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार तालुक्यातील सर्व नागरिकांनी सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार दापोली अर्चना बोंबे यांनी केले आहे.*

अभियान तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे.

पहिला टप्पा- पाणंद रस्तेविषयक मोहिम ही दिनांक- 17 सप्टेंबर, 2025 ते 22 सप्टेंबर, 2025 राबविण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पांदण रस्त्यांचे अभिलेख अद्यावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

या कामकाजाकरीता तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे ग्रामस्तरीय समिती ( मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक) स्थापन करणेत आलेली असून दिनांक 8 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामस्तरावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीत शेतरस्ते मिळण्याबाबत, रस्त्यांबाबत तक्रारी / अतिक्रमण बाबत जास्तीत जास्त अर्ज समितीकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

त्यानंतर या समिती रस्त्यांची यादी करुन विशेष ग्रासमसभेमध्ये मान्यता घेण्यात येणार आहे.

महसूल विभाग- गाव नकाशावर नोंदी नसलेल्या परंतु वापरात असलेल्या रस्त्यांचे व अतिक्रमित रस्त्यांबाबत रस्ता अदालत घेणार आहेत. सर्व रस्त्यांची गाव नमुना 1 (फ) मध्ये नोंद घेऊन सर्व रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे.

भूमी अभिलेख (मोजणी विभाग)- गाव नकाशावर नोंद नसलेले व व अतिक्रमित रस्त्यांची मोजणी करणेत येवून रस्त्यांचे Geo Referencing करणे, सिमांकन व हददीचे सिमा चिन्ह (Boundary Pillars ) स्थापन करण्यात येणार आहे.

ग्रामविकास विभाग- शिवार फेरीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी/ग्रामविकास अधिकारी सहभागी होतील व रस्त्यांच्या प्रस्तावांबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन ग्रामसभा ठराव करणेत येतील.

पोलीस विभाग- आवश्यकतेनुसार अतिक्रमित रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर करणेसाठी पोलीस संरक्षण देणार आहेत.

दुसरा टप्पा – सर्वांसाठी घरे दि. 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025 या कालीवधीत दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.

दापोली उपविभागातील सन 2011 पूर्वीची रहिवास प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची यादी

तयार करण्यात येवून सदरची अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे.

तिसरा टप्पा नावीन्यपूर्ण उपक्रम दिनांक 28 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

यामध्ये दापोली उपविभागातील शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी आवश्यक असलेले दाखले (अधिवास दाखला/ जातीचा दाखला) वाटप करण्यात येणार आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी