मुंबई हायकोर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसर रिकामा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰 मुंबई हायकोर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसर रिकामा

मुंबई | दिल्लीनंतर आता मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी मिळालेल्या एका ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ न्यायालयीन परिसर रिकामा करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, या ई-मेलमध्ये हायकोर्टात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. न्यायालयातील सर्व कामकाज थांबवून कर्मचारी व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

बॉम्ब शोधक व नाशक पथक, कुत्री पथक तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी सुरू आहे.

प्राथमिक तपासात ही धमकी खोटी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी दिल्लीतल्या उच्च न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल आला होता.

👉 अद्याप कोणताही स्फोटक सापडलेले नाही. पोलिसांकडून सायबर सेलच्या मदतीने ई-मेल पाठवणाऱ्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]