अभिनंदन 🌷 श्री. दिलीप डिंगणकर (गुरुजी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

🌸 श्री. दिलीप डिंगणकर (गुरुजी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 🌸

वरळीतील वसंतराव शंकर देसाई विद्यालयाचे शिक्षक ठरले राज्यस्तरीय सन्मानाचे मानकरी

 

मुंबई : वरळी येथील वसंतराव शंकर देसाई प्राथमिक मराठी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक श्री. दिलीप कृष्णा डिंगणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टतर्फे प्रदान करण्यात येणारा 2025 चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या सन्मानामुळे विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक तसेच शिक्षणप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

दिलीप सरांनी 22 वर्षांहून अधिक काळ वसंतराव शंकर देसाई विद्यालयात सेवा देत अध्यापनासोबतच विविध शालेय, सहशालेय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी video/ppt निर्मिती, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती तसेच आनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे.

 

शिष्यवृत्ती व महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेकांना गुणवंत ठरवले. तसेच ऑनलाईन शिक्षण काळात त्यांनी दोन वर्षे सातत्याने अध्यापन करून “शाळा बंद पण शिक्षण सुरू” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

 

वक्तृत्व, वेशभूषा, क्रीडा, संगीत अशा अनेक स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, त्यांच्या सुंदर हस्ताक्षराने व फलक लेखनाने त्यांनी विशेष छाप पाडली आहे. महानगरपालिकेच्या प्रशिक्षणांमध्ये Resource Person (RP) म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

 

मुख्याध्यापिका सौ. राजश्री चाळके, विभाग निरीक्षक श्री. इरफान शाह कादर शाह सर, सहकारी शिक्षक, पालक व सर्व कर्मचारी यांच्यावतीने दिलीप सरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

 

 

📸 फोटो

 

 

🔖 हॅशटॅग :

 

#आदर्शशिक्षक #दिलीपडिंगणकर #वरळीशाळा #DrAmbedkarTrust #शिक्षणप्रेमी #RatnagiriVartaha

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें