पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलचा मुलांचा रिले संघ विजेता

पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलचा मुलांचा रिले संघ विजेता

आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्यातील देवघर येथे संपन्न झालेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित, माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलांच्या रिले संघाने 4*100 मी. रिले या प्रकारामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. आर्यन मते, रसिक पाष्टे, श्रेयस सोलकर, साहिल माटल आणि करण भुवड या खेळाडूंनी अतिशय जोरदार खेळ करत अंतिम सामन्यांमध्ये सर्व संघावर मात करून गुहागर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे या खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याचबरोबर विजयी खेळाडूचे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे,उपाध्यक्ष रामचंद्र मोरे ,सचिव श्री. नारायण मोहिते, खजिनदार वासुदेव डिंगणकर, शंकर जोशी तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मुख्याध्यापक श्री.विजय पिसाळ यांनी विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.बाळासाहेब लवटे, कर्मचारी श्री. विकास कदम या सर्वांचे अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें