माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद-खंडाळा येथे विद्यार्थी-शिक्षक दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद-खंडाळा येथे विद्यार्थी-शिक्षक दिन उत्साहात साजरा

 

खंडाळा प्रतिनिधी निलेश रहाटे 

 

दि. २३ सप्टेंबर –

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद-खंडाळा येथे विद्यार्थी-शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

या उपक्रमात इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत एक दिवसाचे शालेय कामकाज पार पाडले. वर्गशिक्षण, हजेरी घेणे, शिस्त, वेळापत्रक तसेच प्रशासकीय जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी समर्थपणे सांभाळल्या. विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून कुमार म्हारूप मुल्ला, उपमुख्याध्यापिका कुमारी श्रावणी वझे, तर पर्यवेक्षिका कुमारी प्रगती विचारे यांनी दिवसभर शाळेचे नेतृत्व केले. लिपिक कुमार आयुष कोळंबेकर आणि शिपाई कुमार यश राहटे यांनीही आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.

दुपारी शिक्षक व विद्यार्थी-शिक्षक यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती माता तसेच महान विभूती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. शिवाजी जगताप होते. सभेचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक श्री.प्रभाकर धोपट यांनी केले.

यावेळी विद्यार्थी-शिक्षकांनी वर्गात अध्यापन करताना आलेले अनुभव, मजेशीर प्रसंग व आव्हाने सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रमुख वक्ते प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री.राजेंद्र बलेकर यांनी विद्यार्थ्यांसमोर शिक्षक दिनाचे महत्त्व व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रेरणादायी जीवनपट प्रभावी शब्दांत उलगडून सांगितला.

प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. आनंद पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रल्हाद सरगर, क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव, सहाय्यक शिक्षक श्री. स्वप्निल जाधव आणि सहाय्यक शिक्षिका सौ. वृषाली गराडे यांनी विद्यार्थी-शिक्षकांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी -शिक्षिका कुमारी अधुरी पडवळ हिने तर आभार प्रदर्शन श्री.सुनील कांबळे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रभाकर धोपट व श्री. सुनील कांबळे यांनी काटेकोरपणे केले. प्रशालेचे पर्यवेक्षक,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापक श्री. शिवाजी जगताप यांच्या प्रेरणादायी अध्यक्षीय भाषणाने झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें