विक्रांत जाधव शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख  आमदार भास्करराव जाधव यांनी केला सत्कार, शिवसेनेत उत्साह

विक्रांत जाधव शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख 

आमदार भास्करराव जाधव यांनी केला सत्कार, शिवसेनेत उत्साह

आबलोली (संदेश कदम)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सेना कोअर कमिटी सदस्य श्री. विक्रांत जाधव यांची निवड पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केली. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून त्यांच्या निवडीची घोषणा आज करण्यात आली.

 

या निवडीनंतर चिपळूण येथील संपर्क कार्यालयात आले असता शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी त्यांचा शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 

श्री विक्रांत जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कमी कालावधीत अत्यंत प्रभावशाली अशी कामगिरी केली. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी या काळात केले. मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन अनेक धोरणात्मक निर्णय त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातमध्ये घेतले. आज जिल्हा परिषदेची दिमागदार इमारत उभी राहत आहे त्याचे श्रेयदेखील श्री. विक्रांत जाधव यांना जाते. त्यांच्याच प्रयत्न व पाठपुराव्यामुळे या इमारतीला निधी मंजूर होऊ शकला.

 

शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांनी श्री विक्रांत जाधव यांना राज्य पातळीवर युवा सेनेच्या कोअर कमिटी मध्ये समाविष्ट करून घेतले. या काळात त्यांनी कोकणासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करून युवा सेनेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी मेहनत घेतली.

 

प्रशासकीय कामकाजाची असलेली उत्तम जाण, अभ्यास आणि त्याचबरोबर संघटन कौशल्य त्यामुळे प्रशासन व संघटन अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली छाप पडली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांनी जिल्हा पातळीवरील जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची होती. पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी देखील रत्नागिरीचा जिल्हाप्रमुख मी माझ्या मनात आहे तोच देईन असे उद्गार काढले होते. विक्रांत जाधव यांची निवड करून त्यांनी देखील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

 

या निवडीनंतर आज श्री विक्रांत जाधव हे शिवसेना संपर्क कार्यालयात आले त्यावेळी यावेळी त्यांच्या स्वागत व सरकारसाठी चिपळूण, गुहागरसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यांनी फटाके वाजवून या निवडीचा आनंद व्यक्त केला आणि श्री. विक्रांत जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें