तळवली प्रशालेत म. गांधी लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

तळवली प्रशालेत म. गांधी लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

तळवली(मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर जेष्ठ शिक्षक श्री साळुंके सर यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर इतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.

यावेळी इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु मारीया घारे व कु दीया पवार यांनी भाषणे केली. जेष्ठ शिक्षक श्री गवळी सर यांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांनी मार्गदर्शन केले.

या कार्या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. श्रीनाथ कुळे सर यांनी केले तर प्रा जड्याळ सर यांनी आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें