वालावलकर रुग्णालयात ९ वर्षाच्या अपघातग्रस्त मुलांवर ब्रेन सर्जरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वालावलकर रुग्णालयात ९ वर्षाच्या अपघातग्रस्त मुलांवर ब्रेन सर्जरी..!

आबलोली – (संदेश कदम)…….

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलीत भक्तश्रेष्ठ कमलकरपंत वालावलकर रुग्णालय सावर्डे येथे एका लहान मुलावरती मेंदूच्या कवटीवरील ‘न्यूरो सर्जरी’ वालावलकर रुग्णालयांचे न्यूरो सर्जन डॉ. मुदूल भटजीवाले यांनी यशस्वीपणे केली.

दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी चार चाकी गाडी समोरून येऊन धडकल्याने अपघातात सापडलेल्या चार मुलांना वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यांच्यावर ताबडतोब वालावलकर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. अपघात झालेली मुले ही नायशी गावची होती.त्यातील गाडीतील ९ वर्षाच्या मुलाला अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे आकडी येऊन, तोंडातून फेस येत होता. त्याला बेशुद्ध अवस्थेत वालावलकर रुग्णालयातील आय. सी. यू विभागात ताबडतोब ऍडमिट करण्यात आले. न्यूरो सर्जन डॉ. मुदूल भटजीवाले यांनी रूग्णाची तपासणी केली. त्वरित रुग्णांवर उपचार सुरु केले. रुग्णांचा सी.टी. स्कॅन रेडिओलॉजी विभागांतील प्रोफेसर डॉ. आनंद गजकोष यांनी केला. सी.टी. स्कॅनमध्ये रुग्णांच्या कवटीला फ्रॅक्चर असल्याचे सिद्ध झाले. तुटलेले हाड आत मेंदूमध्ये घुसले होते. ह्या फ्रॅक्चरमुळे मेंदूला लागलेल्या मारामुळे रुग्णाला आकडी आली होती व रुग्ण बेशुद्ध झाला होता. डॉ. मुदूल भटजीवाले न्यूरो सर्जन व डॉ. श्रेया (सर्जन) यांनी ९ वर्षांच्या रुग्णांवर ब्रेन सर्जरी करून कवटीचे फ्रॅक्चर जे मेंदूत आत घुसलेले होते ते शास्त्रक्रिया करून व्यवस्थीत केले. ह्या लहान मुलाला शस्त्रक्रिया करतेवेळी भूल देण्याचे काम वालावलकर रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. गौरव बावीसकर, डॉ. शिवानी. डॉ. सलोनी यांनी केले . शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आता पूर्णपणे शुद्धीत आहे. जीवदान मिळाले म्हणून नातेवाईकांनी रुग्णालयाचे आभार मानले. या शिवाय ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेत संपूर्णपणे मोफत झाल्याने पालकांना दिलासा मिळाला .

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam