भोम येथे नवीन ग्रामपंचायतीच्या इमारतीचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

 

📰 भोम येथे नवीन ग्रामपंचायतीच्या इमारतीचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्केवाडी बौद्धवाडी मार्गावरील पुलासाठीही निधी मंजूर – आमदार जाधव

 

भोम (ता. चिपळूण, प्रतिनिधी) :

गुहागर मतदारसंघातील भोम गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिर्केवाडी बौद्धवाडी मार्गावर पुलाच्या कामालाही गती मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली.

 

या भागातील पक्षाचे विभागप्रमुख आणि गावचे उपसरपंच मिलिंद शिर्के यांनी तसेच ग्रामस्थांनी पुलाच्या कामाची मागणी आमदार जाधव यांच्याकडे केली होती. त्यावर आमदारांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. दोन्ही कामांचे भूमिपूजन आमदार भास्कर जाधव आणि जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या हस्ते पार पडले.

 

या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख जितेंद्र (पप्या) चव्हाण, तालुका मुंबई समन्वयक अशोकराव नलावडे, सरपंच श्रावणी मोहिते, नंदू चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील पक्षाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

🏷️ हॅशटॅग्स:

#भास्करजाधव #गुहागर #भोमग्रामपंचायत #रत्नागिरीवार्ताहर #चिपळूण #विक्रांतजाधव #ग्रामविकास #स्थानिकबातमी

 

📸 फोटो

 

 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें