दापोली एसटी आगारात दत्त मंदिरातील दानपेटी फोडली; अवघ्या तासांत पुणे जिल्ह्यातील आरोपीला अटक!

crime

दापोली एसटी आगारात दत्त मंदिरातील दानपेटी फोडली; अवघ्या तासांत पुणे जिल्ह्यातील आरोपीला अटक!

 

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्याला दापोली पोलिसांनी त्वरित पकडले; ५०० ते ७०० रुपयांची चोरी.

दापोली ९ ⌈वार्ताहर ⌉ : सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक वास्तव दापोलीतून समोर आले आहे.

दापोली एसटी आगाराच्या आवारात असलेल्या श्री दत्तगुरू मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने ५०० ते ७०० रुपयांची किरकोळ रक्कम लंपास केली.

ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली.

मात्र, दापोली पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच दापोली आगाराचे बस अधिकारी राजेंद्र एकनाथ कुबाळे (वय ५७, रा. बस अधिकारी क्वार्टर्स, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

त्यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात इसमाने मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली आणि त्यातील सुमारे ५०० ते ७०० रुपये चोरी केले.

या प्रकरणी कुबाळे यांनी कायदेशीर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

दापोली पोलीस ठाण्यात भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) अंतर्गत गु.आर. क्र. १९१/२०२५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

तांत्रिक माहिती आणि स्थानिकांच्या सहकार्याने पोलिसांनी तपास करत आरोपीचा माग काढला. १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांनी पोलिसांनी ओम बाळकृष्ण सातपुते (वय ३९, रा. तळेगाव ढमढरे, ता. शिरुर, जि. पुणे) याला अटक केली.

प्राथमिक तपासात त्यानेच दानपेटी फोडून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

जरी चोरीची रक्कम किरकोळ असली तरी धार्मिक स्थळावर दरोडा टाकण्याच्या या कृत्यामुळे दापोली परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते.

पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला तातडीने अटक झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

 


 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें