गुहागर तालुका महिला आघाडी संघटकपदी सौ.सिद्धी सुरज सुर्वे यांची नियुक्ती.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुका महिला आघाडी संघटकपदी सौ.सिद्धी सुरज सुर्वे यांची नियुक्ती.

आमदार भास्कर शेठ जाधव यांनी दिले नियुक्ती पत्र , संघटने साठी काम करा आणि शिवसेना UBT पक्ष विस्तारासाठी महिलांना सामाऊन घ्या .

गुहागर: सुजित सुर्वे -पडवे .

आगामी येऊ घातलेल्या  स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुहागर मतदार संघात शिवसेना UBT पक्षाची सघटनात्मक बांधणी सुरु असून.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) ज्येष्ठ नेते आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तालुका महिला आघाडीच्या संघटकपदी सौ. सिद्धी सुरज सुर्वे यांची अधिकृतपणे नियुक्ती केली आहे. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार जाधव यांनी  नियुक्तीपत्र देण्यात  आले आहे.

आरेगाव, ता. गुहागर येथील रहिवासी असलेल्या सौ. सिद्धी सुरज सुर्वे यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात, आमदार जाधव यांनी ‘जय महाराष्ट्र’सह सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. या नियुक्तीद्वारे त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम सोपवले आहे.

महिलांपर्यंत  पक्षाचे कार्य  पोहोचवण्याचे निर्देश:

पक्षाने सौ. सिद्धी  सुर्वे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांनी गुहागर तालुक्यातील अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पत्रात नमूद केले आहे. या माध्यमातून तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची अपेक्षा आमदार जाधव यांनी व्यक्त केली आहे.

आमदार जाधव यांनी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व ध्येय धोरणांचा उल्लेख करून, ते विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.  तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छ्या  हि दिल्या आहेत

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गुहागर तालुक्यात महिला आघाडीच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सौ. सिद्धी  सुर्वेव यांची या पदावर निवड होताच गुहागर शिवसेना समन्वयक विनायक काका मुळे, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव , तालुकाप्रमुख सचिन बाईत , पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, सचिन जाधव,सुरज सुर्वे .वनिता डिंगणकर  सह तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी त्यांना प्रत्यक्ष आणि सोशल मिडिया च्या माध्यमातून अभिनंदन केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला