कोकणातील पहिला एफएसटीपी प्रकल्प गुहागरात डंपिंग ग्राऊंडमध्ये ऊभारणी,डंपिंग ग्राऊंड होणार निसर्गोउद्यान

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोकणातील पहिला एफएसटीपी प्रकल्प गुहागरात

डंपिंग ग्राऊंडमध्ये ऊभारणी,डंपिंग ग्राऊंड होणार निसर्गोउद्यान

आबलोली (संदेश कदम)
कोकण पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित व सुजलाम सुफलाम करण्यासाठी केंद्र सरकार सलग्न असलेल्या एचएसबीसी बैंक पुरस्कृत सीडीडी इंडिया बेंगलोर या एनजीओ कपनीच्यावतीने गुहागर नगर पंचायत कार्यक्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडमध्ये एफएसटीपी (फिकत स्लज ट्रिटमेंट प्लांट) मल गाळ प्रक्रिया केंद्र उभारणी केला आहे हा प्रकल्प कोकणातील एकमेव प्रकल्प ठरला असून गुहागरबरोबर मालवण येथेही या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे
सीडीडी इंडिया बैंगलोर या कंपनीच्यावतीने कोकणातील समुद्रकिनारी पर्यावरण संरक्षणाचे काम सुरु आहे. यातून त्या-त्या ठिकाणी होणाऱ्या वातावरण बदलाचे निरीक्षक व परीक्षण या कंपनीच्यावतीने केले जात आहे. यासाठी एचएसबीसी बँकेतर्फे आर्थिक सहाय्य केले जात असून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे गेले काही महिने गुहागर शहरातील गटार, नाले यांची तपासणी करण्यात आली होती यामध्ये इ-कोलायचे प्रमाण दिसले होते. यामुळे समुद्र किनारपट्टी अधिक सुरक्षित करण्यासाठी व गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प जागा अधिक सुरक्षित असल्याने कोकणातील पहिला प्रकल्प गुहागर येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, गुहागर नगर अभियंता विजय भूतल, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, अभियंता आशिष खांबे यांना बेगलोर येथे तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर गुहागर नगर पंचायतीच्या घनकचरा प्रकल्पामध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.एफएसटीपी प्रकल्प हा शौचालयाच्या मैलापासून खत निर्मितीबरोबर त्यामधून वेगळे करण्यात येणाऱ्या पाण्याचा वृक्ष संवर्धनासाठी वापर केला जात आहे. याची क्षमता प्रती दिन ३ केएलडी असून गुहागर शहरातून संकलन
होणाऱ्या शौचालयाच्या टाकीतील मैलाच्या प्रमाणानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी एन्व्हॉर्मेट इंजिनिअरिंगवर आधारित सोलराईजचा वापर करण्यात आला आहे जेणेकरून या एफएसटीपी प्रकल्पामधील आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलावर जास्त उष्णता देऊन त्या मलाची कुजण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. हनी वॅगनच्या सहाय्याने आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलापासून सोनखत निर्मिती केली जाणार आहे. तसेच यामधील पाणी फिल्टर करून या पाण्याचा वापर झाडांसाठी केला जाणार आहे.मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी हा प्रकल्प गुहागरमध्ये आणण्यासाठी महत्वाची होणारे सोनखत व पाणी याचा वापर घनकचरा भूमिका बजावली आहे तर यातून तयार प्रकल्पात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे भविष्यात गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प हा एका उद्यानाप्रमाणे बहरणार आहे. प्रकल्पात शहरातून जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून ७ दिवसात ७० किलोपर्यंत कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. सुखा कचऱ्याचे प्लास्टीक क्रश करून ते बाहेर पाठवले जाणार आहे. यामुळे गुहागरचा हा घनकचरा प्रकल्प कोकणासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही.या एफएसटीपी प्रकल्पाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. यावेळी एचएसबीसी इडियाचे बँकेच्या उपाध्यक्ष रोमीत सेन, सीडीडी इंडिया बेंगलोरच्या हेड आदिती पांड्ये, सीडीडी इंडियाचे प्रोग्राम मॅनेजर इरफान उल्ला शरिफ,
मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण व गुहागर नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात