मालवणी ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

 मालवणी ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

नवी मुंबई (मंगेश जाधव):

मालवणी बोली भाषेतील पाच हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

वयोपरत्वे आलेल्या आजारांशी झुंजणाऱ्या गंगाराम गवाणकर यांच्यावर दहिसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

गवाणकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दहिसर येथील अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

‘वस्त्रहरण’ने केले अजरामर:

गंगाराम गवाणकर यांना ‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले. मालवणी भाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहात आणून ते लोकप्रिय करण्याचे मोठे श्रेय गवाणकर यांना जाते. ‘महाभारता’तील व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांवर भाष्य करणारे ‘वस्त्रहरण’ हे फार्सिकल नाटक आजही तितकेच लोकप्रिय आहे. ‘वस्त्रहरण’सारखे कालातीत आणि व्यंगात्मक मांडणी असलेले नाटक मराठी रंगभूमीला देणाऱ्या या ज्येष्ठ लेखकाच्या निधनाने नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें