रिपब्लिकन सेना पं. स.तळवली आणि जि. प.असगोली जागा लढविणार – तालुका अध्यक्ष महेंद्र मोहिते जिल्हा कार्यकारिणी गुहागरात दाखल,दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार

रिपब्लिकन सेना पं. स.तळवली आणि जि. प.असगोली जागा लढविणार – तालुका अध्यक्ष महेंद्र मोहिते
जिल्हा कार्यकारिणी गुहागरात दाखल,दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार

नवीमुंबई (मंगेश जाधव)
आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाच्या गुहागर तालुक्यातील तळवली पंचायत समिती आणि असगोली जिल्हा परिषद गट या दोन्ही जागा लढवण्याचा निर्धार रिपब्लिकन सेना या पक्षाने घेतला आहे.
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या विचाराने आणि कोकण नेते संदेश मोहिते आणि जिल्हाध्यक्ष महेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाने गुहागर तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेनेचा झंजावात सुरू आहे. याचीच परिणीती म्हणून गुहागर तालुका कमिटी यांच्यावतीने तालुक्यातील तळवली आणि असगोली या दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार पक्षाने व पक्षाच्या कार्यकारिणीने घेतला आहे. तालुक्यात रिपब्लिकन सेनेचा प्रचाराचा झंजावात सुरू आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकमताने प्रचाराचे कार्य जोरदारपणे सुरू करीत आहेत. वाडी वस्तीवर तालुक्याचा तथा विशिष्ट गणाचा विकास करण्यासाठी असणारी वचनबद्धता लोकांसमोर मांडत आहेत. प्रस्थापित पक्षांच्या समोर आव्हान उभे करणारी रिपब्लिकन सेना प्रचंड ताकतीने मैदानात उतरले आहे.
राज्यामध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट यांची युती झाली आहे. याचा फायदा निश्चितच तालुकास्तरावर होईल. स्वातंत्र्यानंतरही आजही अनेक गावे वाडी वस्त्या विकासापासून दूर आहेत प्रस्थापित पक्ष आणि फक्त आतापर्यंत सर्वसामान्य जनतेचा मतासाठीच वापर करून घेतला परंतु विकास मात्र कोस दूर राहिला. रिपब्लिकन सेना, पक्ष नेतृत्व ,गावच्या विकासासाठी निश्चितच आशादायी ठरेल असे चित्र आहे.
शिक्षण , रोजगार, क्रीडा, नोकर भरती, महिला विकास, उद्योजकता, शासकीय उपक्रम यासाठी पक्ष नेतृत्व कायम जनतेच्या साठी उपलब्ध असणार आहे.
रिपब्लिकन पक्ष फक्त मतांचा जोगवा मागणारे नसून शाश्वत विकासाचा आदर्शवत पाया रचणारा आहे याचा प्रत्यय जनसामान्यांना निश्चितच येईल. अन्याय अत्याचार यावेळी या पक्षाने तालुका जिल्हा राज्य पातळीवर आंदोलन उभे केलेले आहे. आता जनतेचे विकासासाठी या पक्षाचे उमेदवार निश्चितच आशेचा किरण ठरतील. जनसामान्यांमधूनही या पक्षाच्या उमेदवारांना निश्चितच मतांच्या रूपाने पाठिंबा मिळेल असे चित्र आहे. आपल्या विकासासाठी आपला उमेदवार हे घोषवाक्य घेऊन पक्ष प्रचार रणनीती उभारत आहे.
तालुक्यात ओबीसी नेतृत्वालाही संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे. तालुक्यातील असगोली आणि तळवली या दोन्ही जागा लढणार आणि जिंकणार असा आशावाद पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र मोहिते यांनी व्यक्त केला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाची जिल्हा कार्यकारणी गुहागर मध्ये ठाण मांडून प्रचार करण्याची मोहीम आखली जात आहे. तालुका कमिटीचे अध्यक्ष महेंद्र मोहिते आणि जिल्हा महासचिव संदीप पवार यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन सेना तालुक्यात इतिहास घडवेल.
गुहागर तालुक्यात युती आघाडी आणि प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना चितपट करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी प्रचाराच्या कामास सुरुवात केली आहे. लढणार आणि जिंकणार असा विश्वास येथील जनतेने आणि पक्ष नेतृत्वाने केला आहे

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें