भाजपाच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर खार पुर्व येथे संपन्न
(सौजन्य:जिल्हा सचिव रुपेश मालुसरे)
मुंबई ~ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलार, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम साहेब व विलेपार्ले विधानसभेचे विद्यमान आमदार श्री. पराग जी अळवणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत एकादशी निमित्त उद्या रविवार दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत “भव्य आरोग्य शिबीर” एकताड मैदान, जवाहर नगर, साईबाबा रोड, खार पुर्व, मुंबई आयोजित करण्यात आले होते
या आरोग्य शिबिरातील तपासणी नेत्र तपासणी, सामान्य तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, सी. बी. सी. या सर्वप्रकारच्या चाचण्या मोफद करण्यात आल्या आपण सर्वांनी स्वतः सह आपल्या संपूर्ण परिवाराची आरोग्य तपासणी करून घेऊया. आपले आरोग्य चांगले व निरोगी ठेऊया. चला या भव्य आरोग्य शिबिरात सहभागी होऊया. असे शिबीराचे आयोजक रुपेश मालुसरे यांनी सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष राजेश दाभोळकर, जिल्हा सदस्य लोकेश दवे, जिल्हा महिला सदस्य रश्मी रुपेश मालुसरे कार्यकारणी सदस्य, वाॅर्ड क्र ९४ चे अध्यक्ष नवनाथ दिघे, समाजसेवक कन्हैया पटेल, मंडळ महामंत्री राजन आयकर, मंडळ खजिनदार हरेश मालुसरे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिराचा जवळपास ५०० नागरिकांनी घेतला, डोळे तपासणी केल्यानंतर मोफत चष्मा वाटप करण्यात आले.














