आजपासून आचारसंहिता लागू.

VOTER ID

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

आजपासून आचारसंहिता लागू

📰 आबलोली (संदेश कदम)

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, या कार्यक्षेत्राबाहेरील ठिकाणीही जर एखादा कार्यक्रम, निर्णय किंवा घोषणा मतदारांवर प्रभाव टाकणारी असेल, तर त्या प्रकरणालाही आचारसंहितेचा लागू होईल.

तथापि, नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भातील उपाययोजना किंवा मदत कार्यांवर आचारसंहितेची बंधने लागू राहणार नाहीत.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आजच दोन स्वतंत्र आदेश जारी केले आहेत.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]