कै. सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले हायस्कूल धाऊलवल्ली हायस्कूलचे शिक्षक श्री. कुंभार सर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न.
राजापूर – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गावातील
कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले हायस्कूलचे शिक्षक श्री.कुंभार सर हे नियत वयोमानानुसार दि.३१/१०/२०२५ रोजी वर्षे ३६ सेवा करून सेवा निवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती समारंभ दि.४/११/२०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संस्थेचे चेअरमन श्री.के.पी.गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रशालेच्या मुख्याध्यापिका हरचकर मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना मुख्याध्यापिका श्रीम.हरचकर मॅडम यांनी कुंभार सर यांचे विविध पैलू व्यक्त केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री.कुंभार सर यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये धाऊलवल्ली ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे सचिव श्री.रमेश पाडेकर व मा.चेअरमन श्री.के.पी.गोखले यांनी श्री.कुंभार सर यांचा शाल-श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. तर कमिटी सदस्या सौ.स्वरांगी परांजपे यांनी सरांच्या अर्धांगिणी सौ.प्रज्ञा कुंभार मॅडम यांचा सत्कार केला. त्यानंतर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीम.हरचकर मॅडम व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पूर्व व्यवसाय शिक्षणचे सर्व निर्देशक यांनी स्टाफ तर्फे श्री.कुंभार सर व कुंभार मॅडम यांचा शाल-श्रीफळ व भेट वस्तू देवून सत्कार केला.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांतून शिक्षण क्रांती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री.आर.एन. जाधव व उदयनराजे कांबळे,शालेय समिती सदस्य श्री.भरत जाधव,श्री. गोरे गुरुजी,सौ.स्वरांगी परांजपे, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.प्रांजली बाणे,सौ.विधी गिजम, सौ.कबीराज,सुशांत शिंदे,ग्राम पंचायत सदस्या सौ.सुचिता आपटे,सौ.रेश्माआपटे,सौ.अश्वनी राणे,कोंडगे हायस्कूलचे शिक्षक श्री.काशिनाथ चव्हाण,कशेळी हायस्कूलचे शिक्षक श्री.फोडकर सर व कांबळे सर,देवाचे गोठणे हायस्कूलचे शिक्षक श्री.सुके सर,जैतापूर हायस्कूलचे श्री.पंगेरकर सर,फिशरीजचे माजी मुख्याध्यापक श्री.कथेकर सर,नाटे गावचे माजी सरपंच श्री.धाक्रस सर,लोकमान्य पतपेढीचे श्री.नवाळे सर,एल.आय.सी.एजंट श्री.आंबेकर सर,श्री.व सौ.मनिषा नार्वेकर,आडीवरेतील श्री.रमेश शेठ वाडकर आदी मान्यवरांनी सत्कार केला.
गोखले हायस्कूल मधील शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री.कोकरे सर यांनी कुंभार सर यांच्या बरोबरच्या काही आठवणी व्यक्त केल्या.तर विद्यार्थी प्रतिनिधीतून सानिका प्रकाश आयर हिने कुंभार सर विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम शिक्षक म्हणून कसे होते हे आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी उत्सवमूर्ती श्री.कुंभार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सन -२०३२ हे शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा एक भव्य दिव्य असा स्नेहमेळावा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
शालेय समिती चेअरमन श्री.के.पी.गोखले यांनी श्री.कुंभार यांना भावी आयुष्य सुखसमृद्धी चे जावे अशा शुभेच्छा दिल्या.मुंबई कमीटी अध्यक्ष श्री.एस्.आर्.गोखले यांनी कार्यक्रमाच्या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे श्री.कुंभार सर यांना भावी आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापिका श्रीम.हरचकर मॅडम,श्री.आर.एन.जाधव,श्री. उदयराजन कांबळे,श्री.काशिनाथ चव्हाण श्री.भरत जाधव व माजी विद्यार्थी इत्यादी मान्यवरांनी सरांना शुभेच्छा दिल्या.
शालेय समितीचे चेअरमन श्री.के. पी.गोखले,धाऊलवल्ली ग्राम विकास मंडळ चे सचिव श्री.रमेश पाडेकर,सदस्य श्री.भरत जाधव,श्री गोरे गुरुजी,सौ.स्वरांगी परांजपे,पोलीस पाटील सौ.सोनाली नार्वेकर,काशिनाथ चव्हाण,मुनीर बली,काशिनाथ गिजम,संदीप गिजम,मोहन तोस्कर,आज्ञा मेस्त्री मुख्याध्यापिका श्रीम.हरचकर मॅडम सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पालक,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी तसेच सरांच्या अर्धांगिणी सौ.प्रज्ञा कुंभार मॅडम व चिरंजीव डॉ.राहुल प्रशालेचा समस्त विद्यार्थी वर्ग,इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















