शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे निवड..!
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील सुमारे दहा विद्यार्थी व विद्यार्थिनींची डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली.नुकत्याच पार पडलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेमध्ये या सर्व विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले व कृषि विद्यापीठातील विविध कृषि विषय विभागांमध्ये आपला प्रवेश निश्चित केला व शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाची पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेमध्ये असणारी यशाची दैदीप्यमान परंपरा कायम राखली. यामध्ये कुमारी प्रणाली नलावडे ( कीटक शास्त्र विभाग),कु.पवन यमगर ( उद्यानविदया विभाग),कु.अभिजीत शिंदे ( वनस्पती शास्त्र),कुमारी आकांक्षा पाटील ( पशु शास्त्र विभाग), कुमारी सुरवी सैंदाने ( मृदा शास्त्र विभाग) ,कु.अभिषेक डिसले ( कृषि शास्त्र विभाग),कुमारी पुजा गायकवाड ( वनस्पती प्रजनन शास्त्र),कुमारी दीप्ती राणे ( कृषि विस्तार विभाग) ,कु. अनिरुद्ध रांबाडे ( उद्यान विद्या विभाग) व कुमारी प्रज्ञा शिंदे ( वनस्पती रोगशास्र विभाग) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील,सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सखोल मार्गदर्शन लाभले.















