आबलोली येथे कुणबी नागरी सह. पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथे कुणबी नागरी सह. पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आबलोली येथे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात शासन निर्देशित आदर्श उपविधी स्वीकृत करणेबाबत या महत्त्वाच्या विषयावर पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली.

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते यांनी सभेचे प्रास्ताविक केले तर कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी सभेच्या सूचने नुसार शासन निर्देशित आदर्श उपविधीच्या पुस्तकातील 1 ते 64 पानातील प्रत्येक मुद्द्याचे वाचन केले. त्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र गुरुजी, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, ज्येष्ठ संचालक पांडुरंग पाते यांनी पतसंस्थेची “अ” वर्गातील वाटचाल, आगामी आव्हाने, कर्ज वाटप,कर्ज वसुली तसेच शासन निर्देशित आदर्श उपविधी स्वीकृत करणे बाबत.मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर पतसंस्थेचे संपर्क प्रमुख अनंत गावडे यांनी सूचना मांडली या सूचनेला संपर्कप्रमुख विजय मसुरकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी यांनी शासन निर्देशित आदर्श उपविधी स्वीकृत करणे या ठरावाची घोषणा केली आणि उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात हा ठराव मंजूर केला.

यावेळी गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, ज्येष्ठ संचालक पांडुरंग पाते, संचालिका सौ. श्रावणी पागडे, तज्ञ संचालक अनंत पागडे, संदीप पाष्टे,संचालक महादेव वणे, संदेश कदम, अमोल वाघे, उदय गोरिवले, वैभव आदवडे यांचेसह गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी या तिन्ही शाखा मधील सभासद महिला – पुरुष तसेच संपर्कप्रमुख बहुसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण सभेचे व्यवस्थापन कार्यलक्ष संचालक अनिल घाणेकर, कर्मचारी संजय आग्रे, वैभव बागवे, संतोष हुमणे, संजय खापले, सुशील फडकले, सचिन भेकरे, प्रणय मोहिते यांनी केले होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात