गुहागर शिवसेनेत खळबळ; आनंद भोजने यांचा विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर शिवसेनेत खळबळ; आनंद भोजने यांचा विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा

गुहागर (जि. रत्नागिरी) – शिवसेना गुहागर विधानसभा क्षेत्रप्रमुख आनंद गोविंद भोजने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यातील शिवसेना संघटनेत खळबळ उडाली आहे. वैयक्तिक, कौटुंबिक तसेच व्यावसायिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे.

आनंद भोजने यांनी आपला राजीनामा पत्राद्वारे उत्तर रत्नागिरीचे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण यांना सादर केला आहे. “मी गुहागर विधानसभा क्षेत्रप्रमुख या पदाचा राजीनामा देत आहे. कृपया हा राजीनामा मान्य करून मला संबंधित जबाबदारीतून मुक्त करावे,” अशी नम्र विनंती त्यांनी पत्रात केली आहे.

भोजने यांनी पुढे म्हटले आहे की, “मी माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पक्षनिष्ठा जपतच काम केले. पुढेही मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून पक्षाच्या विचारसरणीशी आणि कार्याशी कायम जोडलेला राहीन.”

गुहागर तालुक्यातील मासूर गावचे रहिवासी असलेले आनंद भोजने हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या संघटनेत सक्रिय आहेत. ग्रामपातळीपासून ते विधानसभा क्षेत्रातील विविध संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळेच त्यांच्या अचानक राजीनाम्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाशी निष्ठा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने, ते पुढे कोणती जबाबदारी स्वीकारतात, संघटनेत त्यांची कोणत्या स्वरूपात भूमिका राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गुहागर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदावर आता नव्या नियुक्तीबाबत शिवसेना जिल्हा नेतृत्व लवकरच निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात