सहकार भारती मुंबईच्या वतीने अभ्यास वर्गाचे आयोजन 

सहकार भारती मुंबईच्या वतीने अभ्यास वर्गाचे आयोजन

 

मुंबई- प्रविणभाऊ पवार 

सहकार भारती, मुंबई विभाग मुंबई च्या वतीने रविवार दि. २३/११/२०२५ रोजी श्री मुरलीधर मंदिर सभागृह”, युनियन बँक ऑफ इंडिया जवळ, हनुमान मंदिर शेजारी , आंबेडकर रोड, सायन( पूर्व ), मुंबई या ठिकाणी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० या ठरलेल्या वेळेत अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते

प्रथम दिपप्रज्वलन व उद्घाटन प्रदेश अध्यक्ष व महामंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई अध्यक्ष राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी सहकार्य भारती विषयावर मनोगत केले. प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी सहकार भारती काल आणि उद्या या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले. तर प्रदेश सहसंघटक मंत्री प्रविण बुलाख यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी या विषयावर खुप छान मार्गदर्शन केले. प्रदेश संघटन प्रमुख शरद जाधव यांनी कार्यकर्ता शोध- कार्य दुढिकरण- अभ्यास वर्ग या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 

तानाजी गुजर आणि नितीन पवार यांनी उत्तम प्रकारे केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व सहकार मंत्र गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या अभ्यास वर्गाला मुंबई विभागातील आठ जिल्ह्यांतील अध्यक्ष महामंत्री उपाध्यक्ष संघटक सह संघटक, महिला प्रमुख सह प्रमुख सह अनेक पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें