भाट्ये समुद्रात पर्यटकांवर जीवघेणा प्रसंग; स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत वाचवले प्राण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाट्ये समुद्रात पर्यटकांवर जीवघेणा प्रसंग; स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत वाचवले प्राण

रत्नागिरी : सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या सोलापूरच्या दोन पर्यटकांवर भाट्ये समुद्रात जीवघेणा प्रसंग ओढवला. मात्र स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या धाडस, चपळाई आणि समयसुचकतेमुळे दोघांचे प्राण वाचले. रविवारी दुपारी साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजा तमन्ना मेत्रे (२२) आणि ऋषिकेश राजशेखर कोळी (२३, दोघेही रा. रविवार पेठ, शेळगी, जि. सोलापूर), हे रविवारी भाट्ये समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. दुपारी सुमारे १ वाजता ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. जवळपास दीड तास समुद्राच्या पाण्यात राहिल्यानंतर अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना दमछाक होऊ लागली आणि ते गटांगळ्या खाऊ लागले.

परिस्थिती गंभीर होताच दोघांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आर्त किंकाळ्या किनाऱ्यावर ऐकू येताच भाट्ये गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. किरण अशोक भाटकर यांनी तातडीने आपली ‘कृष्णा’ स्पीड बोट समुद्रात उतरवली. त्यांच्या सोबत पराग चंद्रकांत भास्कर, संचित प्रवीण भाटकर, आदित्य मिलिंद भाटकर आणि महेश नथुराम पिलणकर यांनीही बोटीतून खोल पाण्याकडे कूच केली.

काही मिनिटांच्या या श्वास रोखून धरणाऱ्या बचावकार्यात त्यांनी तेजा आणि ऋषिकेश या दोघांनाही सुरक्षितपणे बोटीत खेचून घेत किनाऱ्यावर आणले. वेळीच केलेल्या या बचावकार्यातील धाडसी भूमिकेमुळे दोघांचे प्राण थेट मृत्यूच्या दारातून परत फिरले.

दोघेही पर्यटक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून त्यांनी आपला जीव वाचवणाऱ्या सर्व तरुणांचे मनापासून आभार मानले आहेत.

रत्नागिरीतील समुद्रकिनारे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असतात. मात्र भरती-ओहोटीचा अंदाज, समुद्रातील प्रवाह, खोल पाण्याची मर्यादा आणि सुरक्षेचे नियम याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून पर्यटकांना नेहमीच सतर्क राहण्याचे, सूचनाफलक व सुचना पाळण्याचे आवाहन करण्यात येते. भाट्ये ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि धाडसाचे मात्र सर्वत्र कौतुक होत असून, “समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेत स्थानिकांचा सहभाग किती महत्वाचा आहे याचे हे उत्तम उदाहरण” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात