कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा २०२५ ची अंतिम फेरी स्वा. सावरकर सभागृह, दादर येथे प्रेक्षकांच्या उत्साही गर्दीत पार पडली. नवोदित कलावंतांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रियदर्शन जाधव, कादंबरी कदम आणि अनिकेत विश्वासराव उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जयवंत वाडकर ह्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला अधिक भारदस्त स्वरूप लाभले.

अंतिम फेरीत स्वातंत्र्य सौभाग्य (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय), पाकिस्तानचं यान (नाट्यांकुर), द गर्दभ गोंधळ (वझे महाविद्यालय), थिम्मक्का (ज्ञानसाधना महाविद्यालय) आणि मढं निघालंय अनुदानाला (कलांश थिएटर) या पाच एकांकिकांचे सादरीकरण झाले. विषयवैविध्य, धारदार संवाद, दिग्दर्शनातील पकड आणि कलाकारांच्या उत्कृष्ठ सादरीकरणामुळे सभागृहात क्षणोक्षणी टाळ्यांचा कडकडाट होत होता.

स्पर्धेचा उत्कर्षबिंदू ठरलेल्या मढं निघालंय अनुदानाला या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पारितोषिक पटकावले, तर पाकिस्तानचं यान द्वितीय क्रमांकावर निवडले गेले. उल्लेखनीय कलाविष्कारासाठी द गर्दभ गोंधळ आणि थिम्मक्का यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

वैयक्तिक पुरस्कारांतही तरुण कलावंतांनी दमदार कामगिरी केली. सर्वोत्कृष्ट लेखक: प्रतीक चौधरी (मढं निघालंय अनुदानाला), दिग्दर्शन: महेश कापरेकर व सागर चव्हाण (मढं निघालंय अनुदानाला), नेपथ्य व प्रकाशयोजना: सिद्धेश नांदस्कर (थिम्मक्का), संगीत: सुबेध माकंडकर व चिन्मय सावंत, रंगभूषा: तेजश्री पिलनकर, वेशभूषा: मैथिली मोडे व प्रिया ढगे (पाकिस्तानचं यान).

अभिनय विभागात ओमकार काकडे, प्रसनजीत गायकवाड, राहुल पेडणेकर आणि अपर्णा घाघरे यांचे सादरीकरण विशेष ठरले. सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रचिती जामभावकर, सहाय्यक अभिनेता पुरस्कार विजित थिस, तर विनोदी भूमिका साकारल्याबद्दल सेजल जाधव यांना पारितोषिक देण्यात आले.

संपूर्ण स्पर्धेत तरुण कलाकारांनी दाखवलेली ऊर्जा, निपुणता आणि व्यावसायिकता पाहून प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. रंगभूमीच्या नव्या पिढीने आपली प्रयोगशीलता, नाट्याभिनय आणि कलात्मकता यांची प्रगल्भ झलक अंतिम फेरीत सादर केली. दादरच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे असे हे दर्जेदार नाट्यपर्व यंदाही उत्साहात आणि तरुण कलावंतांच्या प्रभावी सादरीकरणाने यशस्वीरीत्या पार पडले आणि उपस्थितांवर अविस्मरणीय ठसा उमटवला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्काराने सन्मानित”

आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके "राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्काराने सन्मानित" आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील निर्मल...
Read More
आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्काराने सन्मानित”

एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा

एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा आबलोली (संदेश कदम)...
Read More
एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा