📰 मालवणात पैशांच्या बॅगा? वैभव नाईक यांचा शिंदे व राणेंवर गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल
सिंधुदुर्ग ~मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. यामध्ये आता माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मालवणात पैशांच्या बॅगा नेल्या गेल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय तापमान आणखीन वाढले आहे.
🔴 शिंदेंच्या भेटीदरम्यान ‘पैशांच्या बॅगा’चा व्हिडीओ व्हायरल
वैभव नाईक म्हणाले, “परवा एकनाथ शिंदे
मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागे बॉडीगार्ड पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन कॅमेरापासून लपण्यासाठी धावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सर्वांनी पाहिला आहे.”
🔴 निलेश राणेंवरही पैसे वाटपाचा आरोप
ते पुढे म्हणाले, “निलेश राणे भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत आहेत; पण स्वतः त्यांनीही काल मालवणमध्ये पैसे वाटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तेही धुतल्या तांदळासारखे नाहीत.”
🔴 ‘सत्तेचा गैरवापर करून पैशांचा खेळ’ – वैभव नाईक
नाईक यांनी दावा केला की,
“राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून जमवलेला पैसा निवडणुकांमध्ये उधळला जात आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा — हे शिंदे शिवसेनेचे धोरण झाले आहे.”
🔴 मालवणच्या जनतेला आवाहन
यावेळी नाईक यांनी मालवणकर मतदारांना संदेश दिला —
“हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर विचारपूर्वक मतदान करा.”
मालवणच्या राजकारणात या आरोपांमुळे खळबळ माजली असून संबंधित व्हिडीओमुळे निवडणूक वातावरणात आणखी ताण निर्माण झाला आहे.















