गणराज क्लबची कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिला राज्यस्तरीय अंजिक्यपद तायक्वॉडो स्पर्धेत रौप्यपदक

🌟 गणराज क्लबची कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिला राज्यस्तरीय अंजिक्यपद तायक्वॉडो स्पर्धेत रौप्यपदक 🥈

रत्नागिरी ~(वार्ताहर)

35 वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वॉडो स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे 5 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले होते. राज्यभरातून तब्बल 300 खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

 

या प्रतिष्ठित स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबची कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर (इयत्ता 12 वी, लोकनेते शामरावजी पेजे ज्युनिअर कॉलेज) हिने प्रभावी कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. ही तिची एकूण 17 वी राज्यस्तरीय स्पर्धा असून वरिष्ठ गटातील ही तिची पहिलीच स्पर्धा होती.

 

त्रिशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू व एशियन युनियन कोच श्री. प्रशांत मनोज मकवाना, तसेच महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. गणराज क्लबने यापूर्वीही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भक्कम कामगिरी नोंदवली असून, त्रिशाच्या यशामुळे क्लबचा गौरव आणखी वाढला आहे.

 

त्रिशाच्या कामगिरीत तिच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचेही सर्वांनी नमूद केले. तिच्या या यशाबद्दल तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारिणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, तसेच जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण के., खजिनदार शंशाक घडशी यांनीही त्रिशाचे अभिनंदन केले आहे.

 

तसेच गणराज क्लबचे पदाधिकारी अध्यक्ष सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूंळा, स्नेहा मोरे, परेश मोंडूला, शलाका जावकर, एस.आर.के. चे प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत, तसेच सर्व पालकवर्ग यांनीही त्रिशाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें