वैभव चिपळूणकर यांना अखेर ग्राहक तक्रार निवारण मंच,रत्नागिरी – कोर्टातून मिळाला न्याय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वैभव चिपळूणकर यांना अखेर ग्राहक तक्रार निवारण मंच,रत्नागिरी – कोर्टातून मिळाला न्याय

बिल्डर संतोष परांजपे यांनी दिले तक्रारदारास पाच लाख पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई सहित संपूर्ण रक्कम

 

 

चिपळूण (वार्ताहर):-

चिपळूण तालुक्यातील कोलेखाजन येथील रहिवासी श्री.वैभव भगवान चिपळूणकर यांनी फ्लॅट बुकिंग करण्यासाठी चिपळूण धामणवणे येथील बिल्डर श्री.संतोष दिनकर परांजपे,कल्पतरू डेव्हलपर्स,कपिला पार्क यांच्याकडे ग्रामपंचायत हद्द्दीत सर्व्हे नं- ८२(०),सर्व्हे नं- ७६/१अ/१ या मिळकतीमध्ये पहिला मजला ,१०१ कार्पेट एरिया व बिल्टअप एरिया ७८.८१ चौ.मी असणारी निवासी सदनिका बुकिंग केली होती.त्यासाठी बिल्डर श्री.संतोष परांजपे यांना चेकद्वारे पाच लाख रुपये बुकिंगसाठी रक्कम देण्यात आली होती.त्याप्रमाणे मा.दुय्यम निबंधक कार्यालयात साठेकरार दि.०७/०१/२०२२ रोजी करण्यात आला होता.

परंतु, सन २०२५ आले तरी अद्याप कोणतेही निवासी सदनिका काम सुरू नसल्याने मी वारंवार बिल्डर श्री. संतोष परांजपे यांना विचारणा करीत होतो. त्यावेळी कोणतेही काम सुरू नसल्याचे माझ्या निदर्शनास आल्यावर आपण काम करत नसाल तर माझी बुकिंग रक्कम मला परत द्यावी असं मी सांगितले. परंतु त्यावर समाधानकारक उत्तर न देता गेली २ वर्षे मी त्याचा पाठपुरावा करीत होतो. परंतु मला कोणतीही रक्कम देण्यात आली नाही.

त्यानंतर ७ जानेवारी २०२३ व १२ जानेवारी २०२३ रोजी दोन लाख व तीन लाख असे अनुक्रमे दोन चेक देऊन मी बँकेत दोन्ही चेक टाकल्यावर चेक बाऊन्स झाले. त्यावर माझ्या लक्षात आले की, माझी फसवणूक होते. त्यानंतर मी लगेचच रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग या कोर्टात लेखी तक्रार व पुराव्यासहित दाखल केली.

मा.ग्राहक तक्रार निवारण आयोग,रत्नागिरी यांच्या न्यायालयात ग्राहक क्रमांक अर्ज – ०४/२०२५ प्रमाणे प्रकरण सादरीकरण झाल्यावर माझी कैफियत लेखी व तोंडी सादर केली. व कोर्टात लेखी पुरसिस दाखल केली. त्यावर सामनेवाला बिल्डर श्री.संतोष दिनकर परांजपे, कल्पतरू डेव्हलपर्स कपिला पार्क धामणवणें,चिपळूण यांना नोटीस देत कोर्टात सामनेवाला यांनी लेखी म्हणणे सादर केले. यावेळी ३१ मे २०२५ पर्यंत मी संपूर्ण रक्कम त्यांना परत करेल असे लेखी पुरसिस कोर्टात बिल्डर यांनी सादर केली. परंतु ३१मे २०२५ पर्यंत संपूर्ण रक्कम देण्यात आले नाही. व पूर्तता केली नाही. त्यानंतर पुढील तारखेला सामनेवाला यांनी लेखी म्हणणे न्यायालयात सादर करीत थोडी थोडी रक्कम देण्याचे कबूल केले.व त्याप्रमाणे ११ मार्च २०२५ रोजी पन्नास हजार देत रक्कम पुढे देत असे एकूण अशी संपूर्ण मुद्दल रक्कम एकूण पाच लाख रुपये मा.ग्राहक तक्रार निवारण रत्नागिरी आयोगाच्या न्यायामुळेच मला मिळालीआहे.

आयोगासमोर झालेल्या चर्चेनुसार तडजोडीअंती नुकसानभरपाई म्हणून एकूण पन्नास हजार रुपये मला डी.डी.स्वरूपात मला देण्यात आले. असे एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये देण्यात आले.व तसे लेखी पोचपावती करून घेण्यात आली.

” माननीय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, रत्नागिरी याच न्यायालयातून आज मला न्याय मिळाला. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. असे तक्रारदार वैभव भगवान चिपळूणकर यांनी मत व्यक्त केले.

मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या न्यायालयात दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी नि.१७ कडे पुरसीस दाखल केली. त्यामध्ये ठरलेल्या न्यायालयासमोर लेखी तडजोरीनुसार नि. १५ येथे दाखल संयुक्त तडजोडीनुसार साठेकरार रद्द करण्यात आले. साठेकरार रद्द करते वेळेस बिल्डरची श्री.संतोष परांजपे यांनी नुकसानभरपाईची पन्नास हजार रक्कम डी.डी. स्वरूपात दिली.

रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयात प्रकरण सादर करणे त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन कायद्याचे प्रचारक – प्रसारक महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रमुख मार्गदर्शक माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष श्री.योगेश तानू पेढांबकर यांचे विशेष सहकार्य मला लाभले असे तक्रारदार वैभव चिपळूणकर यांनी सांगितले.तक्रारदार श्री.वैभव भगवान चिपळूणकर यांना संपूर्ण रक्कम तसेच नुकसान भरपाई ही मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,रत्नागिरी यांच्यामुळे बिल्डर ने सदर रक्कम दिली आहे.

रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रत्नागिरी यांच्या यांच्यामुळेच मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.त्यामुळे तक्रार अर्ज नि.१७ च्या पुरसिसप्रमाणे सदर तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला आहे.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात