संतांनी दाखवलेल्या सन्मार्गाचे अनुकरण करूया – प्रा. संदीप महाडिक

संतांनी दाखवलेल्या सन्मार्गाचे अनुकरण करूया – प्रा. संदीप महाडिक

आबलोली (संदेश कदम )

संत जगनाडे महाराजांचे कार्य आपण पाहिले तर महाराष्ट्रा मध्ये संत तुकाराम यांचे जेवढे कार्य आहे. तशाच पद्धतीचे संत जगनाडे महाराज यांचे सुद्धा कार्य आहे. संत तुकाराम महाराजांचे जे काय ग्रंथ होते. अभंग असतील किंवा त्यांच्या गाथा त्या आपल्याला माहिती आहे. त्या इंद्रायणी मध्ये बुडवलेल्या होत्या. आणि मग त्यामध्ये असणारे जे काही ज्ञान आहे. ते समाजाला सन्मार्ग दाखवणारे जे काय अभंग आहेत. तो सगळा अमूल्य साठा संत जगनाडे महाराजांनी संकलित केला. तसेच स्वतःहून बरेच काही लिखाण केले आणि समाजाला एक सन्मार्ग दाखवला. सन्मार्ग दाखवणारी परंपरा जी आपल्या महाराष्ट्राला फार मोठी लाभली आहे. त्यापैकीच एक संत जगनाडे महाराज सुद्धा होते. संतांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले आहे. सन्मार्ग दाखवलेला आहे.आपण सर्वांनी संतांनी दाखवलेल्या सन्मार्गाचे अनुकरण करूया असे जाहीर आवाहन प्राध्यापक संदीप महाडिक यांनी केले

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राध्यापक संदीप महाडिक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्राध्यापक संदीप महाडिक पुढे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांचे जे कार्य आहे.यामध्ये संत जगनाडे महाराज यांचे मोठे योगदान आहे. संत तुकाराम महाराज यांचे जे 14 प्रमुख टाळकरी होते त्यामध्ये संत जगनाडे महाराज हे सुद्धा प्रमुखच होते. अशी माहिती प्राध्यापक संदीप महाडिक यांनी दिली.आणि संत जगनाडे महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे ग्रामविस्तार अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, सौ. वैष्णवी नेटके यांनीही संत जगनाडे महाराज यांच्या विषयी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. पायल गोणबरे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पवार, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर,आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी, दत्ताराम कदम, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, सौ. समिधा महाडिक, रत्नाकर पागडे, रमेश महाडिक, , श्रीमती. पद्मा मारुती पाटील,सौ. अनुपमा कदम, शिवराम यादव,आबलोली पोस्ट ऑफिसचे अधिकारी नित्यानंद कुळये आदी. मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें