महाराष्ट्रातील सर्व महापालिका निवडणुका महायुती मिळून लढणार; एकनाथ शिंदे–रवींद्र चव्हाण बैठक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व महापालिका निवडणुका महायुती मिळून लढणार; एकनाथ शिंदे–रवींद्र चव्हाण बैठक

 

देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण चर्चा; कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये संयुक्त लढाईचा निर्णय

नागपूर ~

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकणारा निर्णय महायुतीकडून जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या महत्त्वपूर्ण भेटीनंतर राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीत महापालिका निवडणुकांसाठीची प्राथमिक रणनीती, जागावाटप आणि प्रचाराची आखणी यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. विशेषतः मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपा–शिवसेना (शिंदे गट) मिळून जोरदारपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय झाला आहे.

 

या सर्व प्रक्रियेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याची माहिती समोर येते. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा हा निर्णय आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मोठे राजकीय चित्र बदलवू शकतो.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]