अटकेची शक्यता असतानाच मंत्री माणिकराव कोकाटे आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अटकेची शक्यता असतानाच मंत्री माणिकराव कोकाटे आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | प्रतिनिधी

मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. दरम्यान, अटकेची शक्यता असतानाच माणिकराव कोकाटे आजारी पडल्याची माहिती समोर आली असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमी दरात सदनिका खरेदी केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवले आहे. सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवल्याने कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, हायकोर्टाकडून शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होण्याची तरतूद असल्याने, कोकाटे यांची आमदारकीही धोक्यात आली आहे.

जिल्हा न्यायालयाने स्पष्ट आदेश पारित केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वतीने अटक वॉरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. आशुतोष राठोड यांनी सांगितले की, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटकेचे आदेश दिले असून, त्यांनी तातडीने पोलिसांसमोर शरण यावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले आहेत.

तसेच लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नैतिकतेच्या आधारे त्यांनी मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडे विधी व न्याय विभाग असल्याने, कायद्याचे राज्य असल्याचे दाखवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, असे मत वकिलांनी व्यक्त केले.

दरम्यान, सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोकाटे यांच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. कोकाटे यांना शरण येण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती, मात्र ती नामंजूर करण्यात आली. मात्र अटक वॉरंटाविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याची माहिती कोकाटे यांचे वकील अ‍ॅड. मनोज पिंगळे यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के कोट्यातून लाटलेल्या चार सदनिकांच्या प्रकरणात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी अंतिम सुनावणीत फेब्रुवारी महिन्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत, दोघांनाही दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयामुळे कोकाटे यांची अटक तसेच आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला