लाटवण फाटा येथे भरधाव दुचाकीची धडक; ६० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी

crim

लाटवण फाटा येथे भरधाव दुचाकीची धडक; ६० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी

रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकीस्वाराकडून अपघात, मदत न करता चालक पसार; मंडणगड पोलिसांत गुन्हा दाखल

 

मंडणगड तालुक्यातील लाटवण फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक देऊन अपघात केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाला आहे.

 

अनिता अनंत कदम (वय ६०, रा. लाटवण) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलीसह बँकेतून पैसे काढण्यासाठी जात असताना लाटवण फाटा येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एका भरधाव अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर कोसळल्या असून त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आहे.

 

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर १०८ रुग्णवाहिकेने त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

 

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने फरार चालकाचा शोध सुरू आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें