चिपळूणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आमदार भास्करराव जाधव यांची भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आमदार भास्करराव जाधव यांची भेट

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत राहण्याचा निर्धार; जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचे मार्गदर्शन

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्करराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगामी सर्व निवडणुकांमध्ये आपण आमदार भास्करराव जाधव आणि शिवसेना (उबाठा) पक्षासोबत एकत्र राहणार असल्याचा ठाम शब्द वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या भेटीदरम्यान राजकीय सद्यस्थिती, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करत एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे श्री. विनोद कदम, श्रीधर सकपाळ, जयरत्न कदम, सुभाष जाधव, सुशांत जाधव, सुधाकर पवार आदींसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमुळे चिपळूण तालुक्यात आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]