शीर प्रीमियर लीग पर्व ५ मोठ्या उत्साहात संपन्न
विरार ~ शीर कुणबी ग्रामस्थ मंडळ संलग्न शीर कुणबी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शीर प्रीमियर लीग पर्व ५ ही क्रिकेट स्पर्धा रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी HDIL, विरार पूर्व – चंदनसार येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

स्पर्धेची सुरुवात खेळपट्टी पूजनाने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. शीर गावासाठी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून तरुणांसाठी एक सामाजिक उत्सव असून, बहुजन समाजातील तरुणांना एकत्र आणून संवाद व विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याच्या प्रामाणिक हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.
या प्रसंगी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. वसंतजी भुवड, सचिव श्री. शांताराम ठोंबरे, उपाध्यक्ष श्री. रमेश मोरे, खजिनदार श्री. सुरेश मोरे, सहसचिव श्री. मोहन मोरे, माजी अध्यक्ष श्री. यशवंत ठोंबरे, कुणबी युवक मंडळ गुहागर-मुंबई अध्यक्ष श्री. सुनील ठोंबरे, सचिव श्री. संतोष फटकरे, तसेच श्री. भूपेंद्र गोणबरे, श्री. मंगेश बारस्कर, श्री. रमेश मोरे (तवसाळ गट सहसचिव) यांच्यासह तालुक्यातील श्री. संदीपदादा मांजरेकर, श्री. रविंद्रजी रामाणे, एस.के. स्पोर्ट्सचे मालक श्री. संदेश कातळकर, तवसाळ गावातील वाघे कुटुंबीय यांसह अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी व हितचिंतक उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार शीर कुणबी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. किरणजी मोरे, सचिव श्री. सचिनजी ठोंबरे, खजिनदार श्री. अमितजी ठोंबरे, कार्याध्यक्ष श्री. नितीनजी ठोंबरे व संपूर्ण समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा समिती प्रमुख श्री. संदेश मते, श्री. विजय मोरे, श्री. शैलेश ठोंबरे, श्री. रुद्रेश गोरीवले, श्री. दीपक ठोंबरे, श्री. वैभव कावणकर यांनी विशेष मेहनत घेतली.
स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन श्री. सुनील ठोंबरे, श्री. सागर डावल, श्री. सुशांत ठोंबरे, श्री. अजित ठोंबरे, श्री. अशोक मोरे यांनी केले. स्कोअरर म्हणून श्री. नरेश मते, श्री. संदेश सलपे, श्री. सचिन ठोंबरे तर पंच म्हणून श्री. संदीप सोलकर, श्री. सुनील घराटे, श्री. संदेश मते, श्री. विजय मोरे, श्री. दीपक ठोंबरे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे निकाल :
विजेता संघ: मैत्रीबंध क्रिकेट संघ, वरची ठोंबरेवाडी
उपविजेता संघ: श्री पांडुरंग स्मृती क्रिकेट संघ, सापसनवाडी
मालिकावीर: श्री. शैलेश ठोंबरे (खालची ठोंबरेवाडी)
उत्कृष्ट फलंदाज: श्री. संदेश मते (खालची ठोंबरेवाडी)
उत्कृष्ट गोलंदाज: कुमार आदित्य धोपट (धोपटवाडी)
उगवता सितारा: कुमार राज ठोंबरे (वरची ठोंबरेवाडी)
फायनल मॅन ऑफ द मॅच: श्री. शैलेश ठोंबरे
सर्व विजेत्यांचे शीर कुणबी युवा प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत समालोचक श्री. सुनील ठोंबरे यांनी अध्यक्षांच्या वतीने स्पर्धेचा समारोप जाहीर केला.
















