गुहागर तालुक्यातील खोडदे गिरवणेवाडी येथील सुरेश केशव साळवी यांचेकडून आई-वडिलांच्या स्मरणार्थ 5 स्मशान भूमींसाठी 10 सोलर लाईटची देणगी

गुहागर तालुक्यातील खोडदे गिरवणेवाडी येथील सुरेश केशव साळवी यांचेकडून आई-वडिलांच्या स्मरणार्थ 5 स्मशान भूमींसाठी 10 सोलर लाईटची देणगी

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील खोडदे गावातील गिरवणेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी यांनी आपल्या आई-वडिलांच्या (कै.वासंती केशव साळवी, कै. केशव गोपाळ साळवी) स्मरणार्थ खोडदे गावातील 1) खोडदे येथील स्मशान भूमी,2) बौद्धवाडी स्मशान भूमी, 3) मोहिते, निवातेवाडी स्मशान भूमी, 4) गोणबरे वाडी स्मशानभूमी, 5) खापले वाडीच्या स्मशान भूमी अशा प्रत्येकी दोन प्रमाणे म्हणजेच 5 स्मशानभूमींसाठी 120 w च्या 10 सोलर लाईट देणगी म्हणून दिल्या आहेत.
निर्मल ग्रामपंचायत खोडदे येथे ह्या सोलर लाईट खोडदे गिरवणेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी यांनी सरपंच कु. पूजा गुरव, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य शुभांगी डिंगणकर, रवींद्र निवाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, जगदीश साळवी, कृषी अधिकारी ए. जी. बेले, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन मोहिते, वैभव निवाते, पुनम पवार यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे खोडदे गावातील पाचही स्मशानभूमी सोलर लाईटच्या प्रकाशाने उजळणार आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी यांना खोडदे गावातून प्रत्येक वाडी,वस्तीतील ग्रामस्थांकडून धन्यवाद देण्यात येत आहेत.

[ditty id=23248]
RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें