बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारविरोधात मुंबईत मराठा महासंघाचा निषेध

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारविरोधात मुंबईत मराठा महासंघाचा निषेध

मुंबई | प्रतिनिधी

बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुरू असलेल्या अमानुष अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबई उपनगर जिल्हात अखिल भारतीय मराठा महासंघ आणि क्षत्रिय मराठा सेवा संस्था, हिंदू समाज बांधवांच्या वतीने तीव्र संत व्यक्त करण्यात आला. या अत्याचारांचा निषेधासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा यांना तसेच निर्मलनगर पोलिस ठाणे खार पुर्व मुंबई यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

सन १९७१ मध्ये भारताने भारताने बांग्लादेशाला पाकिस्तानातल्या जुलमी राजवटीतून मुक्त करून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यास मोलाची भुमिका बजावली होती. मात्र आज त्याच बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर सातत्याने अन्याय, हिचाचार व धार्मिक छळ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. हिंदूची घरे जाळली जात असून, धार्मिक स्थळांची तोडफोड केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी दिपू चंद्र दास या निष्पाप हिंदू नागरिकांला रस्त्यावर फरफटत नेत झाडाला उलटे टांगून अमानूष मारहाण करून जाळून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण हिंदू समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदू समाज बांधवांनी एकत्र येत या अमानवी कृत्याचा निषेध केला. निवेदनाद्वारे भारत सरकारने व परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, बांगलादेश सरकारवर दबाव आणून तेथील हिंदूंना संरक्षण मिळावे, तसेच दोशींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवून “हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही गप्पा बसणार नाही” असा इशारा दिला. भविष्यात या विषयावर ‌आवाज उठवत राहण्याचा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें