रिक्षा व्यावसायिक मालक संघटना आबलोली यांचे वतीने नववर्षाच्या प्रारंभी आबलोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक मालक संघटना आबलोली, तालुका गुहागर या रिक्षा व्यवसायिक मालक संघटनेच्या प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी नूतन वर्ष 2026 या वर्षाच्या स्वागतासाठी, नूतन वर्षाच्या प्रारंभी गुरुवार दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 08:00 वाजता श्री.सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून सकाळी 09:00 वाजता महाआरती व तीर्थप्रसाद तसेच सायंकाळी 07:00 वाजता आबलोली, खोडदे गावातील स्थानिक मंडळाचे सुस्वर भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर रात्रौ 09:00 वाजता लकी ड्रॉ सोडत भाग्यवान विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर रात्रौ 10:00 वाजता श्री. रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी या नमन मंडळाचा बहुरंगी, बहूढंगी नमन सादर करण्यात येणार असून पौराणिक गण “सिंधुरासुरचा वध”, रंभा नृत्य व गणेश वंदना तसेच गवळण हा कार्यक्रम सादर होणार असून “गवळणींचा सुंदर नृत्याविष्कार आणि “मावशीची धमाल” कार्यक्रम त्यानंतर लेखक मनोहर होरंबे लिखित “श्रीकृष्ण लीला” हे वगनाट्य सादर होणार आहे.
तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील जनतेने मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन रिक्षा व्यावसायिक मालक संघटना आबलोली या संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष गोपीनाथ शिर्के, कोषाध्यक्ष अनिल साळवी,सचिव अजित मोहिते, सहसचिव प्रशांत कदम, सल्लागार प्रवीण भंडारी, धनदीप साळवी, प्रकाश चाचे, दौलत शिर्के, दिनेश पागडे, सदस्य मनोज भोजने,योगेश साळवी, दत्ताराम साळवी, मंगेश मास्कर, तुषार भोजने, समीर चाचे, सर्वेश पवार, मनोज पवार, प्रशांत गोणबरे, संदीप दिवेकर, अमित करंजकर, मोहिते, ऋषिकेश झगडे, सागर चव्हाण, प्रशांत सुर्वे, निखिल सुर्वे, सर्वेश सुर्वे,स्वप्नील सुर्वे, निरंजन सुर्वे, कृपेश गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
















