महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा-2025 रविवारी रत्नागिरीत

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा-2025 रविवारी रत्नागिरीत

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 ही परीक्षा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी तालुक्यातील 3 उपकेंद्रावर एक सत्रामध्ये (प्रत्यक्ष परीक्षेची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 12.00) या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 1190 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील उपकेंद्रांवर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.*

1. रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी उपकेंद्रावर RT001001 ते RT001336,

2. पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी उपकेंद्रावर RT002001 ते RT002360 व

3. फाटक हायस्कूल रत्नागिरी या उपकेंद्रावर RT003001 ते RT003494 बैठक व्यवस्था आहे.

परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना :-आयोगा मार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/ गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे.
—

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें