गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

गुहागर

रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत पंचायत समिती गुहागर गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री गळवे साहेब यांच्या, मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.पालपेणे हायस्कूल वरदान क्रीडा नगरी येथे संपन्न झालेल्या क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी, क्रिकेट, लांब उडी, उंच उडी ,धावणे, थाळीफेक, गोळा फेक ,इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.सदर स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .सदर प्रसंगी गट शिक्षणाधिकारी गळवे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी वळवी साहेब, केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम केंद्रप्रमुख खर्डे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री चिपळूणकर साहेब ,केंद्रप्रमुख श्री माने सर अडूर ,श्री कांबळे सर निघुंडळ, पालपेणे वरदान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री हसबे सर, केंद्रप्रमुख श्री वसावे सर, जिल्हा शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष श्री अरविंद पालकर सर ,गुहागर तालुका क्रीडा संयोजन समिती पदाधिकारी व सर्व सदस्य सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी जिल्हास्तरीय पंच, प्रतिष्ठित नागरिक श्री घोरपडे, श्री.दिनेश जानवळकर , विविध खेळांचे विभाग प्रमुख व्यवस्थापक पंच, गुहागर तालुक्यातून आलेले मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षण सेवक ,पालक ,शाळा व्यवस्थापन समिती ,अध्यक्ष ,सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोठा गट मुले क्रिकेट अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये गुहागर बीटाने अडूर बीटावर निर्विवाद विजय संपादन केला. विविध खेळ प्रकारामध्ये यजमान गुहागर , अबलोली, चिखली, अडूर या चार बीटातील संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते .त्यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी गळवे साहेब म्हणाले की अत्यंत नियोजनबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पालपेणे हायस्कूल येथील वरदान क्रीडा नगरीमध्ये संपन्न झाल्या.सदर स्पर्धेमध्ये भोजन व्यवस्था ,बक्षिसे, नियोजन करिता केंद्रीय प्रमुख व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.जिल्हास्तरावरील नियमांचे पालन करून स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या, त्याबद्दल गुहागर तालुका क्रीडा संयोजन समिती व सर्व शिक्षक पंच यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले .सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रभू हंबर्डे सर यांनी केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात