तवसाळ येथील शेतकऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकामाचा आरोप ९ जानेवारीपासून चिपळूणमध्ये आमरण उपोषणाचा इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तवसाळ येथील शेतकऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकामाचा आरोप

९ जानेवारीपासून चिपळूणमध्ये आमरण उपोषणाचा इशारा

♦ आशोका बिल्डकॉनकडून आंबा बाग उद्ध्वस्त; महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधातही आंदोलन. शिवस्वराज्य शेतकरी संघाचे तालुकाध्यक्ष मंदार मुकुंद रहाटे यांनी दिला आहे.


गुहागर – (सुजित सुर्वे )  प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील मौजे तवसाळ येथील शेतकरी उमेश नंदकुमार सुर्वे यांच्या जमिनीवर परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकाम करून पारंपरिक आंबा व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप करत शिवस्वराज्य शेतकरी संघटनेने ९ जानेवारी २०२६ पासून चिपळूण येथे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

तसेच गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अनागोंदी, निष्काळजी व जनविरोधी कारभाराविरोधात आबलोली महावितरण कार्यालयासमोरही उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

आंबा बाग नष्ट; शेतकरी कुटुंब उपासमारीच्या मार्गावर

शेतकरी उमेश सुर्वे यांच्या मालकीची सर्वे नं. २६/२ व २६/४ ही सामाईक जमीन असून या ठिकाणी ८५ आंबा कलमे असलेली नोंदणीकृत बाग (७/१२ उताऱ्यावर नोंद) होती. या बागेवर महाराष्ट्र ग्रामीण बँक, आबलोली शाखेचे KCC कृषी कर्जही आहे.

असे असताना आशोका बिल्डकॉन कंपनीने कोणतीही परवानगी न घेता जबरदस्तीने ऑफिस, लेबर कॉलनी व काँक्रीट प्लांट उभारून संपूर्ण जमिनीला कंपाऊंड केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
यामुळे पारंपरिक आंबा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून संबंधित शेतकरी कुटुंब उपासमारीच्या मार्गावर असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांना जमिनीत प्रवेश नाकारला

कंपनी पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीत प्रवेश देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी

  • ३० ऑक्टोबर २०२५ रोजी वकिलामार्फत नोटीस,
  • २० डिसेंबर २०२५ रोजी लेखी तक्रार
    देऊनही शासन व कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

महावितरणविरोधात तीव्र संताप

याचबरोबर गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधातही शिवस्वराज्य शेतकरी संघ आक्रमक झाला आहे.

संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —

  • स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिल; मीटरसाठी ८–१० हजार रुपयांचा खर्च अन्यायकारक
  • आबलोली सब-स्टेशनचे अधिकारी कायम अनुपस्थित
  • अनेक गावांतील विजेचे पोल जंगलेल्या व कोसळण्याच्या अवस्थेत
  • वीजपुरवठा खंडित झाल्यास २–२ दिवस वीज न येण्याची समस्या
  • आबलोली बाजारपेठेतील धोकादायक पोल व कमी उंचीवरील तारा तातडीने बदलण्याची गरज

दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी आबलोली येथे कंटेनरच्या धडकेत पोल व तारा रस्त्यावर कोसळूनही अधिकारी वेळेवर न आल्याने रस्ता तासन्‌तास बंद राहिला, सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

मुख्य मागण्या

  • तात्काळ बेकायदेशीर बांधकाम हटवावे
  • उद्ध्वस्त आंबा बागेची नुकसानभरपाई द्यावी
  • जमिनीचा योग्य मोबदला मिळावा
  • जीर्ण पोल, डीपी व वायर बदलून केबल लाईन टाकावी

मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच राहणार

मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच राहील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व महावितरण अधिकाऱ्यांची राहील, असा ठाम इशारा
शिवस्वराज्य शेतकरी संघाचे तालुकाध्यक्ष मंदार मुकुंद रहाटे यांनी दिला आहे.


 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात