निर्मल ग्रामपंचायत पडवेतील गटार व रस्ता कामांवर गंभीर आरोप; आमदार भास्करशेठ जाधवांकडे तक्रार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निर्मल ग्रामपंचायत पडवेतील गटार व रस्ता कामांवर गंभीर आरोप; आमदार भास्करशेठ जाधवांकडे तक्रार

♦ निकृष्ट दर्जाचे गटार बांधकाम, खोट्या दस्तऐवजांवर रस्ता प्रस्ताव; चौकशी होईपर्यंत कामे थांबविण्याची मागणी


📰 गुहागर ~(वार्ताहर)

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत पडवे यांच्या कार्यक्षेत्रात शासकीय योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गटार बांधकामासह वादग्रस्त रस्ता कामांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून शासकीय नियम व तांत्रिक निकषांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्रामस्थ गजानन गडदे, सुजेंद्र सुर्वे, समीर गडदे व प्रभाकर रहाटे यांनी या प्रकरणी पंचायत समिती गुहागर येथील गटविकास अधिकारी (BDO) शेखर भिलारे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करून संपूर्ण खातेनिहाय चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, तवसाळ फाटा ते पडवे-भाटले ते बंदर टोक (जेटीपर्यंत) हा रस्ता सध्या वादग्रस्त असून या रस्त्याबाबत संबंधित जमीन मालकांची कायदेशीर लढाई सुरू आहे. असे असतानाही खोट्या व चुकीच्या दस्तऐवजांच्या आधारे रस्ता प्रस्ताव तयार करून शासनाचा निधी खर्च केला जात असल्याचा गंभीर आरोप जमीन मालकांनी केला आहे. आता याच रस्त्यावर ग्रामपंचायत पडवे सरपंच यांनी नाव बदलून शासनाची दिशाभूल करून निधी खर्च करत आहेत. पडवे भाटले ते ग्रामपंचायत असा नवा रस्ता चे नावे खोटा प्रस्ताव तयार केला आहे असे समजते . आता काहीजणांचा उदरनिर्वाह च ग्रामपंचायत च्या जीवावर सुरू आहे बोगस प्रस्ताव तयार करा याचे निधी लाटायाचे आणि मीच कसा गावचा विकास करतो अशा येड्या खुळ्या ( फक्त त्यांच्या भोवती फिरणारे ) लोकांना खुश करत राहायचं. कोणी आवाज केला की त्याला पुन्हा वेगळं वळण द्यायचं. हेच सुरू आहे.

पालकमंत्री यांचे नावाने ठेकेदार यांचेवर दबाव.
आता निवडणुकी जवळ आल्याने त्या जोरावर काही स्वयंघोषित पुढारी आणि ठेकेदार पडवे मधील एका विशिष्ठ  समाजाची मतं मिळवण्यासाठी ठेकेदार यांचे वर पालकमंत्री  यांचे नावे फोन  करून  काम सुरू करण्यासाठी दबाव आणत आहेत असे समजते. कारण या लिहपरिषद गट मध्ये आपला आता निभाव येणार नाही. हे इथल्या पैसे खाऊन पक्षाचं काम करणाऱ्या गावठी पुढारी यांना चांगल माहित झालं आहे. तर जे कोणी पुढारी पडवे येथील काही लोकांची मत मिळवण्यासठी जोरदार प्रयत्न करत आहेत त्यांनी आधी स्वताच्या गावात महिलांना पाणी मिळण्या साठी तेवढेच प्रयत्न केले तर निदान तिथली स्थानिक मत मिळतील.याची पण चर्चा आता लोकां मध्ये सुरु आहे.

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड चे अधिकारी पडवे सरपंच यांना मॅनेज?
मागील दोन वर्षांपासून ग्रामस्थ व जमीन मालकांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, रत्नागिरी यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उलट तोच  निधी कोणतीही प्रशासकीय मंजुरी नसताना वळवण्याचा हेतू तर नाही? अशी शंका आता ग्रामस्थ घेत आहेत.

तक्रारीनुसार, सदर रस्त्यासाठी चुकीचे संपत्तीपत्र वापरण्यात आले असून काही जमीन मालकांच्या खोट्या सह्या घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदाराने डबर.खडी व इतर साहित्य टाकून जबरदस्तीने रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

तर 26 जानेवारी ला उपोषण करण्यात येणार …                                                                                                                                                                            तर येथील मुख्य तक्रारदार आणि ज्यांनी पडवे ग्रामपंचायत चे अनेक बोगस कामाचे पोस्ट मार्टेम करणारे माजी उपसरपंच आणि RTI कार्यकर्ते सुजेन्द्र सुर्वे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कडे खातेनिहाय सर्व कामा ची कसून  चौकशी होत नाही म्हणून उपोषण करण्याची नोटीस दिल्याचे समजते.

या संपूर्ण प्रकरणात सरपंच, ठेकेदार व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डमधील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासनाचा निधी गैरप्रकाराने वापरला जात असल्याची गंभीर शंका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अर्जदार समीर विद्याधर गडदे यांनी आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून गटार व रस्ता कामांची सखोल व खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]