महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा रत्नागिरी जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न ( मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव )

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा रत्नागिरी जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न

( मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव )

आबलोली(संदेश कदम)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेच्या श्री.शिवछत्रपती सभागृहात नुकताच संपन्न झाला. सदरच्या मेळाव्याचे कार्यक्रमाध्यक्ष स्थान गुहागरचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी भूषविले . जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यामधील गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सन्मानचिन्ह,शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हा व गुहागर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज पाटपन्हाळे विद्यालयात नुकताच रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा कार्यक्रमाध्यक्ष डॉ.विनय नातू , माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाध्यक्ष , विशेष अतिथी व मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमात माजी कोकण पदवीधर आमदार कै. अशोक मोडक, शिक्षक परिषद संस्थापक अध्यक्ष कै. वसंतराव काणे, कै. उल्हास फडके, रत्नागिरीचे माजी शिक्षणाधिकारी कै. प्रकाश परब , कामगार नेते कै. बाबा आढाव व इतर सामाजिक चळवळीमध्ये असणाऱ्या व नुकतेच निधन झालेल्या मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सुस्वर सादर केले. रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा कार्यक्रमाध्यक्ष , प्रमुख अतिथी यांच्यासह राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, राज्य कार्यवाह लक्ष्मण वालगुडे , राज्य उपाध्यक्षा हेमलता मुनोत , कोकण विभागाचे माजी अध्यक्ष रवींद्र इनामदार , कोकण विभाग सहकार्यवाह सुनील गौड , कोकण विभाग कोषाध्यक्ष प्रकाश पाटील , रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष किरण देशपांडे , जिल्हा कार्यवाह पांडुरंग पाचकुडे , जिल्हा सहकार्यवाह विनायक जाधव, जिल्हा संघटक गणेश कुलकर्णी, जिल्हा कोषाध्यक्ष राजन नाईक, जिल्हा महिला संघटक काजल राऊत, जिल्हा उपाध्यक्ष व चिपळूण तालुकाध्यक्ष जिवन पाटील , दामिनी भिंगार्डे , रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजेश आयरे, राजापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, मंडणगड तालुका अध्यक्ष अमित रसाळ, खेड तालुका अध्यक्ष विजय मस्के,संगमेश्वर तालुका अध्यक्ष भरत धनपाल , दापोली तालुका अध्यक्ष संदीप गोरीवले , गुहागर तालुका अध्यक्ष सुमंत भिडे , जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका कार्यकारणी सदस्य तसेच संघटनेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाध्यक्ष , विशेष अतिथी व मान्यवर यांचा सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्ह्यामधील गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. कमलाकर हरी कांबळे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर अंबडवे – मंडणगड, रवींद्र विक्रमराव बांगर – हुतात्मा बबनराव भोईटे विद्यामंदिर कुंबळे – मंडणगड, शैलेश वसंत कोंडविलकर – एम. के. इंग्लिश स्कुल आजर्ले – दापोली , सेजल सचिन भाटकर – लोकमान्य हायस्कूल दापोली , विजय तातोबा बसवंत – कविता सराफ माध्यमिक विद्यालय लोटे परशुराम – खेड , राकेश रमेश देवरुखकर – श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कुल व ज्यु. कॉलेज, खेड , श्रीधर रघुनाथ जोशी – न्यू इंग्लिश स्कुल तिवरे – चिपळूण, आशा उत्तम नलवडे – मिलिंद हायस्कुल व ज्यु. कॉलेज रामपूर – चिपळूण , अनंतकुमार केशव मोघे – न्यू इंग्लिश स्कुल व गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरुख – संगमेश्वर, प्रकाश शिवाजी दळवी – पैसाफंड हायस्कुल, संगमेश्वर , शुभदा सुनील माने – रा. सि. बेर्डे विद्यालय, सापुचेतळे – लांजा , प्रशांत मच्छिन्द्र अंबवडे – न्यू इंग्लिश स्कुल अँड तू. प. शेट्ये ज्यु. कॉलेज लांजा , दिनकर शंकर बुवा – आचार्य नरेंद्रदेव विद्यामंदिर भू , दर्शना दत्तात्रय मांडवकर राजापूर हायस्कुल , सानिका नितीन पंडित – जी. एम. शेट्ये हायस्कुल बसणी – रत्नागिरी , दिगंबर भागोजी किंजळे – माध्यमिक विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज नाणीज , अनंत हणमंत साठे – सिद्धिविनायक विद्यामंदिर, मुंढर – गुहागर , मनिषा अनिल सावंत – श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर या गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
मार्गदर्शन सत्रात १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची नियुक्ती , विना अनुदानित टप्पा , अनुदानितमध्ये असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची जुनी पेन्शन याबाबत राज्याचे कोषाध्यक्ष व जुनी पेन्शन संघर्ष समिती प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले .राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी १५ मार्च २०२४ चा जाचक शासन निर्णय, टीईटी सक्ती, एनइपी २०२० प्रभावी अंमलबजावणी , शिक्षण अधिष्ठान विधेयक २०२५ , संस्थाचालक – मुख्याध्यापक – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्या , शिक्षक परिषद संघटनेने केलेले काम व भविष्यातील वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले . माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी शिक्षण वाचवा , शासनाचे सध्याचे शैक्षणिक धोरण व भविष्यातील शिक्षणाबाबतचे धोके आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाध्यक्ष माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी कौशल्य आधारित शिक्षणाची गरज व उपयुक्तता , व्यवसायिक शिक्षणाची गरज, रोजगार निर्मिती इ.बाबत मार्गदर्शन केले.
चर्चा सत्रात राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू व राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शनाने उपस्थित शिक्षकांच्या शंका निरसन केल्या . महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हा मेळाव्यासाठी बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सदर मेळाव्यासाठी सकाळी नाश्ता व दुपारी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे व सूत्रसंचालन जिल्हा संघटक गणेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाध्यक्ष , प्रमुख अतिथी , मान्यवर , उपस्थित बहुसंख्य शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विशेष सहकार्याबद्दल गुहागर तालुका अध्यक्ष सुमंत भिडे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान

  रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान १७४ रिक्त पदांसाठी होणार निवडणूक प्रक्रिया; आचारसंहिता लागू होताच ग्रामीण...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे ‘विविध गुणदर्शन’ सोहळा जल्लोषात; आदिवासी ‘तारपा’ नृत्याने लुटली वाहवा!

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे 'विविध गुणदर्शन' सोहळा जल्लोषात; आदिवासी 'तारपा' नृत्याने लुटली वाहवा! शिक्षकांना भावूक निरोप; तवसाळ तांबडवाडी ग्रामस्थ,...
Read More
आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे ‘विविध गुणदर्शन’ सोहळा जल्लोषात; आदिवासी ‘तारपा’ नृत्याने लुटली वाहवा!

पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड

पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड आबलोली (संदेश कदम) जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर होऊन गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल...
Read More
पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड

श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील "खेळ पैठणीचा" उत्साहात आणि जल्लोषात संपन्न सौ. श्रावणी पागडे पैठणीची प्रथम मानकरी तर सौ.वृषाली...
Read More
श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर