संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक घटना; ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक घटना; ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

 

संगमेश्वर | प्रतिनिधी :

संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी येथील एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या शेजारील शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशोक सुडुकु सावंत (वय ६५, रा. तांबेडी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना ३ जानेवारीच्या सायंकाळी साडेपाच ते ४ जानेवारीच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सावंत हे ३ जानेवारी रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध सुरू केला. ४ जानेवारी रोजी सकाळी तांबेडी येथील ‘हेदीचे भात’ नावाच्या शेतात आयनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.

 

अशोक सावंत यांनी कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. वैद्यकीय तपासणीत गळफासामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी सायंकाळी ४.२१ वाजता या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. मयत अशोक सावंत यांच्या पश्चात कुटुंबीय असून या दुर्दैवी घटनेमुळे तांबेडी बौद्धवाडी परिसरात शोककळा पसरली आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें