ग्रामपंचायत जैतापूर मधील विकासकामांचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न

ग्रामपंचायत जैतापूर मधील विकासकामांचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न

 

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

 

राजापूर:-( जैतापुर) :-राजापूर तालुक्यातील विकास कामाचा टक्का वाढत असून,आपल्या अधिकाधिक प्रयत्नाने विकास कामे खेचून आणणारे सन्मा.आमदार किरण भैय्या सामंत यांच्या शिफारशी मुळे ग्रामपंचायत जैतापुर मधील दोन विकासकामांचे दि.०९ जाने.२६ रोजी भूमिपूजन ग्रामस्थाच्या हस्ते करण्यात आले.

जनसुविधा योजनेअंतर्गत जैतापूर मांजरेकर वाडी ते अनंतवाडी रस्त्याला कोटींग करणे, निधी ७.०० लक्ष, तर अनुसूचित जाती व नवं बौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे निधी २.०० लक्ष या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे राज्य सचिव,व पत्रकार समीर शिरवडकर,ग्रामपंचायत सदस्य रुपेश करगुटकर, सदस्य सिकंदर करगुटकर, सदस्या आराध्या माजरेकर, श्रीकृष्ण राऊत, शौनक पावसकर, दिग्विजय पेडणेकर, प्रसाद माजरेकर, सुनील करगुटकर, उदय गिरकर, संदीप चव्हाण, नारायण नार्वेकर, गणेश पवार, बबन पवार, भावेश पवार, दिवाकर पवार, कीर्ती पेडणेकर, मानसी राऊत, श्रीकृष्ण माजरेकर, सनी करगुटकर, यज्ञेश अमरे, आर्यन राऊत इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें