दुर्गेची कोंडवी क्रिकेट असोसिएशन आयोजित पंचक्रोशी चषक २०२६ उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दुर्गेची कोंडवी क्रिकेट असोसिएशन आयोजित पंचक्रोशी चषक २०२६ उत्साहात संपन्न

गुहागर | प्रतिनिधी

दुर्गेची कोंडवी क्रिकेट असोसिएशन, तालुका गुहागर यांच्या वतीने आयोजित पंचक्रोशी चषक २०२६ ही मानाची क्रिकेट स्पर्धा शनिवार दि. ३ जानेवारी व रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी विरार कोपरी मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील तब्बल २४ संघांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे विजेतेपद गतविजेत्या साई इलेवन क्रिकेट संघ, आंबेरे यांनी पटकावले. स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेला दत्तगुरु क्रिकेट संघ, कोळवली उपविजेता ठरला. तर रॉयल इलेवन, आवरे संघाने तृतीय आणि भैरी देवी क्रिकेट संघ, पाचेरी आगर यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.

वैयक्तिक पारितोषिकांमध्ये

  • दिनेश दावडे – उत्कृष्ट गोलंदाज
  • दिपेश घाणेकर – उत्कृष्ट फलंदाज
  • जयदेव भुवड – उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
  • अभिषेक पाते – मालिकावीर (सुपरमॅन ऑफ द टूर्नामेंट)

ठरले.

स्पर्धेसाठी श्री. महेश नाटेकर, श्री. मिलिंद चाचे, श्री. संतोष जैतापकर, श्री. चंद्रकांत आलीम, श्री. संदीप खैर यांनी मोलाचे सहकार्य करत प्रमुख उपस्थिती लावली. तसेच चाकरमानी फेम कु. अवधूत मातली यांच्या सुमधुर वाणीतून सलग दोन दिवस रंगलेले समालोचन क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अजित बादावटे यांच्यासह श्री. अविनाश माटल, श्री. रोशन जोशी, श्री. मंदार बादावटे, श्री. निलेश रामाणे, श्री. निलेश बारस्कर, श्री. राजेश भुवड, श्री. योगेश ठोंबरे, श्री. विनायक भुवड, श्री. दिपक हुमणे, श्री. सुनील भुवड, श्री. उत्तम अवेरे, श्री. अभिषेक पाते, श्री. बंदिश अवेरे तसेच अनेक क्रीडाप्रेमींनी अथक मेहनत व कल्पकतेतून केले. यावेळी माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले.

शिवणे, असोरे, कोळवली, पाचेरी सडा, पाचेरी आगर, आंबेरे खुर्द, कुडली, माटलवाडी, आवरे, जांभारी, काताले आदी गावांतील खेळाडूंच्या सहभागातून २०१६ पासून कार्यरत असलेली दुर्गेची कोंडवी क्रिकेट असोसिएशन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे, स्पर्धा व लीग सामने आयोजित करणे, तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे यासाठी ओळखली जाते. एकी, मैत्री आणि बंधुत्व जपणे हे या असोसिएशनचे वैशिष्ट्य असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound