माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी:- निलेश रहाटे
दि.१२ जानेवारी २०२६
वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा व श्रीम. पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे स्वामी विवेकानंद (युवा दिन) आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.प्रल्हाद सरगर,डॉ.राजेश जाधव,श्री.राजेंद्र बलेकर, श्री.राजा जंगम, सहाय्यक शिक्षिका श्रीमती वृषाली गराडे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.विनायक नांदिवडेकर यांनी विद्येची देवता सरस्वती व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रशालेतील विद्यार्थिनी मानवी खेडेकर हिने आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ यांच्या जीवन व कार्याविषयी अतिशय सुंदर माहिती कथन केली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ.गावडे मॅडम यांनी आपल्या भाषणातून युवा दिनाचे तसेच राजमाता जिजाऊ यांच्याविषयी प्रभावी विचार मांडले. सहा.शिक्षक श्री.राजा जंगम यांनी उपस्थितांना शुभेच्छापर संदेश दिला.या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.सुनील कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी जगताप आणि पर्यवेक्षक श्री.आनंद पाटील यांनी मार्गदर्शन केले.
.















