सोडये आणि बंधु समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ उत्साहात संपन्न

सोडये आणि बंधु समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ उत्साहात संपन्न

 

मुंबई :

सोडये आणि बंधु समाज मंडळ, मुंबई यांच्या वतीने गाव जावडे (कातळवाडी), तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील बांधवांचे वार्षिक स्नेहसंमेलन व महिलांचा हळदीकुंकू समारंभ रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी संत झेवियर्स कॉलेज, सी. एस. एम. टी., मुंबई येथे उत्साहात पार पडला.

 

सालाबादप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम गावप्रमुख व वाडीप्रमुख श्री. संजय कृष्ण सोडये, मुंबई कमिटीचे अध्यक्ष श्री. विलास नारायण सोडये, उपाध्यक्ष श्री. संतोष हरिश्चंद्र सोडये, सेक्रेटरी श्री. राजाराम सखाराम भोवड, उपसेक्रेटरी श्री. राकेश रमेश सोडये, खजिनदार श्री. रवींद्र विश्राम सोडये, उपखजिनदार श्री. दिपक गंगाराम रांबाडे तसेच सर्व कमिटी सदस्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

 

या स्नेहसंमेलनात पहिली ते दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, तसेच विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात आनंदी व उत्साही वातावरण पाहायला मिळाले.

 

मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना वर्षभरात एकमेकांच्या भेटीगाठी होत नसल्याने, सर्व समाजबांधव एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या स्नेहसंमेलनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे त्यांना शैक्षणिक प्रेरणा व योग्य मार्गदर्शन मिळाले, तर हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांनाही एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर व बांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे उपस्थितांना गावाकडच्या आठवणींना उजाळा मिळाला. काही वक्त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करत सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

 

वाडीतील मुंबईस्थित बांधवांच्या उत्तम सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. अखेरीस आयोजकांच्या आभारप्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

— मुंबई – लांजा | जावडे (कातळवाडी)

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें