पडवे जि.प. गटातून ठाकरे सेनेचे सचिन बाईत, पडवे पं.स गणातून रवींद्र आंबेकर, पाचेरी सडा पं. स. गणातून कु. शशिकला मोरे यांना प्रचंड मतांनी निवडूण आणणारच..
पडवे जि.प. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार


आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे गटाची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आबलोली येथे तालुका प्रमुख सचिन बाईत यांच्या निवासस्थानी उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली. या बैठकीला महिला,पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या बैठकीत जिल्हा परिषद पडवे गटातून सचिन बाईत, पडवे पंचायत समिती गणातून रवींद्र आंबेकर आणि पाचेरी सडा पंचायत समिती गणातून कु. शशिकला मोरे यांना मशाल चिन्हावर प्रचंड मतांनी निवडून आणणारच असा निर्धार या बैठकीत उबाठाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एक मुखाने केला आहे.
या बैठकीला तालुका सचिव विलास गुरव यांनी मार्गदर्शन करताना मशाल निशाणी घराघरात पोहोचवा, वाडी – वस्तीवर प्रचार करा, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रचंड मेहनत घ्या आपला विजय निश्चित आहे विश्वास विलास गुरव यांनी व्यक्त केला. यावेळी गुहागर तालुका महिला संघटक सिद्धी सुर्वे, सिद्धी रामगडे, श्रावणी पेडणेकर, ईशा जानवळकर, माजी सभापती पूर्वी निमुणकर, समीक्षा बारगुडे, दिव्या वनकर, पूजा कारेकर, वनिता डिंगणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी आपली भूमिका मांडली व ठाकरे गटाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार केला. या बैठकीला जिल्हा परिषद पडवे गटातून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते















