रेडिओतून जिवंत राहते मराठी भाषा; ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६’चा उत्साही आरंभ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रेडिओतून जिवंत राहते मराठी भाषा; ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६’चा उत्साही आरंभ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रेडिओच्या तरंगांवरून मराठी भाषा घराघरात पोहोचली, शब्दांना आवाज मिळाला आणि संस्कृतीला ओळख मिळाली, असे प्रतिपादन आर. जे. जगदीश यांनी केले. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालयाच्या मराठी विभागच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून ‘रेडिओ हरवला आहे का?’ या विषयावर विशेष रेडिओवरील कार्यक्रम दि. १८ जानेवारी २०२६ रोजी पार पडला.

सदर कार्यक्रम रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ एफ.एम च्या माध्यमातून ‘अलकची झलक’ या कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात आला. या सत्राचे मार्गदर्शन आर. जे. जगदीश यांनी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत केले. कार्यक्रमात रेडिओचे बदलते स्वरूप, आजच्या डिजिटल युगातील त्याचे महत्त्व आणि मराठी भाषेच्या प्रसारातील रेडिओची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला. सहभागींना रेडिओच्या माध्यमातून भाषिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले.

यानंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ‘मुली रंगल्या काव्यात’ हा विशेष काव्यात्मक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सादरीकरण आर. जे. माधवी यांनी केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कवितांमधून मराठी भाषेची गोडी, संवेदनशीलता आणि सृजनशीलता प्रभावीपणे मांडली गेली, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे समालोचन सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आर. जे. जगदीश यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे शैक्षणिक, भाषिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले व विद्यार्थिनींशी सुसंवाद साधत रेडिओच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

सदर उपक्रमाचे निवेदन मराठी विभागप्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्रा. माधवी पवार यांनी केले. मराठी भाषा संवर्धनासाठी रेडिओसारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करून आयोजित केलेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

Gurudatta Wakdekar
Author: Gurudatta Wakdekar

???? गुरुदत्त दिनकर वाकदेकर- मुंबई ???? ???? ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक - महाराष्ट्र मधील विवीध वृत्तपत्रातून लेखन आणि पत्रकारिता

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात