क्रेडाईच्या ‘वास्तूरंग’ प्रदर्शनाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट
स्वप्नातील घर खरेदीसाठी आजचा अंतिम दिवस
रत्नागिरी :
क्रेडाई रत्नागिरी आयोजित वास्तूरंग 2026 या भव्य गृहप्रदर्शनाला रविवारी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी भेट दिली. एकाच छताखाली घरांचे विविध पर्याय, बँक कर्जाची माहिती व सल्ला उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
क्रेडाई रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावाजवळ सातवा कोकण प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर 24 जानेवारी रोजी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी प्रदर्शनाला भेट देत क्रेडाई रत्नागिरी व वास्तूरंग प्रदर्शनाचे कौतुक केले होते.
रविवार 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. घर खरेदीसाठी ग्राहकांना तात्काळ मार्गदर्शन, विविध गृहप्रकल्पांची माहिती तसेच बँक कर्जाविषयी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी क्रेडाई रत्नागिरीचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा क्रेडाई रत्नागिरी यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा यांच्यासह दीपक साळवी, नित्यानंद भुते, श्री. तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
—















