रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव

मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभली रुपेरी झळाळी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती हृदयाची भाषा आणि समाजाचे प्रतिबिंब असते. कवीच्या संवेदनशीलतेतून जीवनाचे अनेक पैलू उलगडत जातात,” असे प्रेरणादायी विचार कविसंमेलन अध्यक्ष मंजिरी श्रीनिवास मराठे यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने आयोजित रौप्यमहोत्सवी कविसंमेलनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. हे कविसंमेलन रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीतील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण आणि साहित्यनिष्ठ वातावरणात पार पडले. मराठी काव्यपरंपरेचा समृद्ध वारसा जपत कवी–रसिक संवाद अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात शब्द, भावना आणि विचारांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
सायंकाळी ४.३० वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. मुक्त विषयांवरील काव्यसादरीकरणाबरोबरच आरती प्रभू यांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन विशेष आकर्षण ठरले. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या संवेदनशील आणि अंतर्मुख काव्यविश्वाचे प्रभावी अभिवाचन रसिकांच्या मनाला स्पर्शून गेले. या प्रसंगी महेश भिकाजी बंडबे लिखित ‘मयावळी’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मंजिरी मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या संग्रहाच्या प्रती उपस्थितांनी उत्साहाने विकत घेतल्या. नवोदित साहित्यिकांच्या पाठी मराठी साहित्य व कला सेवा परिवार खंबीरपणे उभा असल्याचे यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
सदर कविसंमेलनात कल्पना उबाळे, अशोक दशरथ भवार, कृपा राकेश म्हात्रे, ज्योती राखुंडे, प्रफुल अनंत साने, महेश भिकाजी बंडबे, प्रांजली गुरुप्रसाद भट्टगावकर, मोहित जनार्दन तांडेल, डॉ. मानसी पाटील, विक्रांत मारुती लाळे, वनिता सचिन साळुंखे, विवेक वसंत जोशी, वैभवी विनीत गावडे, सानिका आनंदराव येडगे, सीमा खान-शेख, सुनिता पांडुरंग अनभुले, स्मिता शाम तोरसकर, धनंजय पांडुरंग पाटील, समिधा विकास नलावडे आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या कवितांना रसिकांची उत्स्%A

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास

भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने...
Read More
भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास

रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव

रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभली रुपेरी झळाळी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव

मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार

मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार ९ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; १० मार्चपासून...
Read More
मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार

जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू

जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू मुंबई–गोवा महामार्ग प्रकल्पातील कारवाईवर ग्रामस्थांचा...
Read More
जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू

रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी

📰  रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी 🔹 : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग; तिघांविरोधात गुन्हा...
Read More
रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी

देशभरात घरगुती LPG दरवाढ; आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम, नागरिकांच्या खिशावर वाढता भार

📰 : गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महाग; पेट्रोल-डिझेल दर मात्र स्थिर   🔹 : देशभरात घरगुती LPG दरवाढ; आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा...
Read More
देशभरात घरगुती LPG दरवाढ; आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम, नागरिकांच्या खिशावर वाढता भार

न्यायालयीन आदेश टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा

न्यायालयीन आदेश टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा 🔹: उशिरा अपील करून वेळकाढूपणा करणाऱ्यांना अवमान कारवाईपासून सुटका...
Read More
न्यायालयीन आदेश टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा

खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन

खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन आबलोली (संदेश कदम) शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा समन्वयक...
Read More
खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन

कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार तळवली (मंगेश जाधव) गुरुवार दिनांक ५/०३/२०२६ रोजी गुहागर...
Read More
कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप

येथे दिलेल्या माहितीवर आधारित एक सविस्तर आणि 'SEO' (Search Engine Optimization) पूरक बातमी खालीलप्रमाणे आहे: मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८...
Read More
मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप